शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्त्यांसाठी वस्तीशाळा शिक्षकांची धावाधाव

By admin | Updated: May 27, 2014 00:55 IST

बीड : शिक्षकांचे समायोजन पूर्ण केल्यानंतरच वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या देण्यात याव्यात असे शासनाचे स्पष्ट आदेश होते; परंतु जि़प़ च्या शिक्षण विभागाने काही शिक्षकांना डावलले होते़

 बीड : शिक्षकांचे समायोजन पूर्ण केल्यानंतरच वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या देण्यात याव्यात असे शासनाचे स्पष्ट आदेश होते; परंतु जि़प़ च्या शिक्षण विभागाने काही शिक्षकांना डावलले होते़ ‘लोकमत’ने सोमवारी ‘शिक्षक नियुक्त्यांत शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन याला वाचा फोडली होती़ त्यानंतर अन्यायग्रस्त शिक्षकांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेतली़ जिल्ह्यात ६५० वस्तीशाळा शिक्षक आहेत़ विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या वस्तीशाळांवरील निमशिक्ष १४७ आहेत़ शासनआदेशानुसार ज्या निमशिक्षकांनी डीएड पूर्ण केले आहे, त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक म्हणून नियुक्ती करायची होती़ तर बंद वस्तीशाळेवरील शिक्षकांना निमशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देऊन नंतर त्यांचे डीएड पूर्ण करुन घ्यायचे होते़ मात्र, हे करताना दर्जावाढ, बदल्या़ समायोजन करावे असे आदेशात नमूद होते़ जिल्हा परिषदेने दर्जावाढ करण्याची प्रक्रियाही सुरु केली होती; परंतु पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने ती ठप्प करावी लागली़ दरम्यान, जिल्हा परिषदेने मात्र, १७ मे रोजी ६५० पैकी २३८ निमशिक्षकांना शिक्षक म्हणून तर बंद वस्तीशाळेतील १४७ पैकी केवळ १०९ जणांना निमशिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ त्यामुळे उर्वरितांनी काय घोडे मारले? असा सवाल आता उपस्थित होत आहे़ नियुक्त्यांअभावी त्रस्त वस्तीशाळा शिक्षकांनी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या निवासस्थानी धाव घेतली़ त्यानंतर या सर्व शिक्षकांनी अन्यायाचा पाढा वाचला़ यावेळी सभापती संदीप क्षीरसागरही उपस्थित होते़ या दोघांनीही त्यांना दिलासा दिला़ आचारसंहितेचे उल्लंघन न करता कायदेशीर मार्ग काढता येईल, असे आश्वासन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले़ राज्यमंत्र्यांनी विचारला जाब! वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यावरुन राज्यमंत्री सुरेश धस यांनी सीईओ राजीव जवळेकर यांना सोमवारी चांगलेच धारेवर धरले़ जवळेकर पुण्याहून आष्टीमार्र्गे बीडला येत होते़ धस यांनी त्यांना आष्टी तहसीलमध्ये बोलावले़ ते दोघे व जि़प़ अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी बंद दरवाजाआड गुफ्तगू केले़ सर्वच वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या द्या, भेदभाव करु नका अशा शब्दांत धस यांनी जवळेकरांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली़(प्रतिनिधी) पालकमंत्र्यांचे निमंत्रण धुडकावले! सोमवारी राज्यमंत्र्यांपाठोपाठ पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही सीईओ राजीव जवळेकरांना भेटीसाठी बोलावणे पाठविले; परंतु जवळेकर यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही़ रात्री उशिरापर्यंत ते क्षीरसागरांकडे पोहोचले नव्हते़ त्यामुळे सीईओंनी पालकमंत्र्यांची भेट का नाकारली हा चर्चेचा विषय बनलाय. समायोजनानंतरच नियुक्त्या - देवगुडे वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या देताना शासन नियम डावलला जाणार नाही याची दक्षता घेऊ, असे शिक्षणाधिकारी प्रा. भास्कर देवगुडे यांनी स्पष्ट केले. दर्जावाढ, समायोजनाची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु आचारसंहितेमुळे थांबावे लागले. समायोजन करून नंतर नियुक्त्या देऊ, असे ते म्हणाले.