खुलताबादच्या उरसास मंगळवारपासून सुरुवात

By Admin | Updated: December 25, 2014 00:47 IST2014-12-25T00:38:55+5:302014-12-25T00:47:25+5:30

खुलताबाद : येथील हजरत ख्वाजा मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७२८ व्या उरुसास ३0 डिसेंबर मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

Ursas of Khulatabad starts from Tuesday | खुलताबादच्या उरसास मंगळवारपासून सुरुवात

खुलताबादच्या उरसास मंगळवारपासून सुरुवात

खुलताबाद : येथील हजरत ख्वाजा मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७२८ व्या उरुसास ३0 डिसेंबर मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त जय्यत तयारी सुरू झाली आहे.
हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या उरसास सातशे वर्षांची परंपरा असून, हिंदू, मुस्लिम धर्मियांचे पवित्र व श्रद्धास्थान असलेल्या उरसासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. सध्या उरसाच्या तयारीसाठी उरुस व्यवस्था समिती व जिल्हा प्रशासनाने विविध विभागांच्या बैठका घेतल्या आहेत.
उरसानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. ३0 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता संदल मिरवणूक, बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी चिरागाँ १ जानेवारी रोजी शब-ए-बदावा, तसेच ३१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मुजाहेरा-ए-किरआत, दुपारी २ वाजता कुस्ती स्पर्धा, दि. १ जानेवारी रोजी सेमिनार, २ जानेवारी रोजी रात्री ९ वा. मुशाएरा त्याचबरोबर शनिवार ३ जानेवारी रोजी कव्वाली कार्यक्रमास शब्बीर सदाखत साबरी यांच्यात होणार आहे. उरसाच्या तयारीसाठी उरुस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार बालाजी शेवाळे, उपाध्यक्ष अब्दुल रहेमान सुलतान बक्ष, सचिव मुख्याधिकारी सविता हारकर, सदस्य नगराध्यक्षा सुषमा भावसार, मोहंमद युसूफ मोहंमद इसाक, मुनिबोद्दीन मुजिबोद्दीन, अ‍ॅड. कैसरोद्दीन (माजी नगराध्यक्ष) व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहे. उरसाच्या तयारी व नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन यांनी दिली.

Web Title: Ursas of Khulatabad starts from Tuesday