शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना अडत वसुली !

By admin | Updated: May 25, 2014 01:09 IST

दिनेश गुळवे , बीड शहरातील भाजी मंडईतील अडत व्यापारी नियमापेक्षा अधिक अडत घेत असल्याने त्यांचे सर्वच परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केले होते.

दिनेश गुळवे , बीड शहरातील भाजी मंडईतील अडत व्यापारी नियमापेक्षा अधिक अडत घेत असल्याने त्यांचे सर्वच परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केले होते. यानंतर व्यापार्‍यांनी खेटे घालूनही त्यांना परवाना मिळत नसल्याने सध्या विनापरवानाच शेतकर्‍यांकडून अडत वसुली सुरू आहे. कृउबा व नगरपालिका यांच्यातील त्रांगड्यामुळे भाजी मंडई समस्यांचे माहेरघर बनली आहे. बीड शहरातील खासबाग परिसरात व्यापार्‍यांसाठी नगरपालिकेने गाळे बांधून देऊन येथे भाजी मार्केट उभारले आहे. येथे व्यापार करण्यासाठी ८५ व्यापार्‍यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाने दिले होते. येथील व्यापारी शेतकर्‍यांकडून नियमापेक्षा अधिक ‘अडत’ वसूल करीत असल्याचा मुद्दा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे अ‍ॅड. अजित देशमुख यांच्यासह शेतकर्‍यांनी उपस्थित केला होता. यानंतर या प्रकरणात तात्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर कृउबाने सर्व परवाने २८ नोव्हेंबर २०१३ रोजी रद्द केले होते. येथील गाळे नगरपालिकेने बांधून दिले असले परवाना कृउबाने दिला होता. असे असले तरी कृउबा कडून नियमन केले जात नव्हते, तसेच येथे काहीच सुविधा देण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे कृउबा समितीला परवाना देण्याचा अधिकार काय? असा मुद्दाही उपनिबंधक कार्यालयाने उपस्थित केला होता. सध्या येथील व्यापार्‍यांकडे परवाने नसतानाही ते आठ ते दहा टक्के अडत वसूल करीत असून यामुळे शेतकर्‍यांची लूट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश धांडे यांनी केला आहे. मंडईत शौचालय, भाजीपाला ठेवण्यासाठी सावली, पार्किंग नाही, जरासाही पाऊस आला तर व्यापार्‍यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे भिजतात तसेच मंडईत घाणीचे साम्राज्य आहेत. अशा अनेक समस्यांनी ही मंडई ग्रासली असून वारंवार खेटे घालूनही व्यापार्‍यांना परवाना मिळत नसल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जमिरुद्दीन बागवान यांनी सांगितले. तर, कृउबा सचिव आर. पी. बहिर म्हणाले की, व्यापारी नियमांची पुर्तता करीत नसल्याने त्यांना परवाने दिले जात नाहीत. येथे आठ ते दहा टक्के अडत घेऊन शेतकर्‍यांची लूट केली जात होती.यामुळे कारवाई करण्यात आली होती. भाजीमंडईत असलेल्या गाळ्यामध्ये हवा येत नसल्याने भाजीपाला गाळ्यात ठेवला की, एका दिवसात सडतो. तर, बाहेर ठेवल्यास भाजीपाला चोरी जातो. येथे सावलीही नसल्याने उन्हात काम करावे लागते. येथील गाळे नगर पालिकेने बांधले असले तरी परवाना कृउबाचा आहे. त्यामुळे येथील नियमन कोणी करायचे? या त्रांगड्यात सध्ये येथे व्यापार्‍यांसह ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.