शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अवैैध प्रवासी वाहनांनी चाकूरच्या रस्त्यावर कोंडी

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

चाकूर : एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़

चाकूर : बहुजन हिताय्, बहुजन सुखाय असे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांची सोय करू पाहणाऱ्या एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़ तसेच थांबा सोडून गाड्या इतरत्र लावत असल्याने स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे़
चाकूर तालुक्यातील चापोली, लातूर रोड, घरणी आष्टा, म्हाळंग्रा या बसस्थानकावर असा प्रसंग अधिक प्रमाणात दिसून येतो़ एस़टी़चा प्रवास बहुजन हिताय्, बहुजन सुखाय् या ब्रिद वाक्याप्रमाणे सुखद प्रवास असल्याचे समजून ज्येष्ठ नागरिक एस़टी़लाच प्राधान्य देतात़ सध्या उन्हाळी सुटी व लगीनसराईचे दिवस असल्याने बरेच नागरिक सहकुटुंब फिरायला जातात तर काही नागरिक नातेवार्ईक मित्र परिवारांच्या भेटीला जातात़ त्यातच लगीनसराई असल्यामुळे लग्नाला जाण्यासाठीही ग्रामीण भागातून एस़टी़चाच आधार घ्यावा लागत आहे़ दिवसेंदिवस एस़टी़च्या प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे़ परंतु, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ चाकुरातील बसस्थानकात सायंकाळी ६ नंतर बसेस जात नाहीत़ पर्यायाने प्रवाशांना अवैैध प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ तालुक्यातील तेलगाव पाटी ते म्हाळंग्रा हा राज्यमार्ग लातूर ते नांदेड असा आहे़ चापोली येथील बऱ्याच बसेस थांब्यावर थांबत नाहीत़ त्यामुळे हिंप्पळनेर, आनंदवाडी, आजनसोंडा, शंकरवाडी, उमरगा कोर्ट, हणमंत जवळगा आदी गावांतील प्रवासी एस़टी़अभावी ताटकळत बसतात आणि एस़टी़ आली तरी बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांना अवैैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे़ तालुक्यात लातूर रोड येथे दिवसरात्र २० ते २५ रेल्वे गाड्या धावतात़ लातूर रोड परिसरात मोहनाळ, कडमुळी, सावरगाव, सांगवी येथील रेल्वेतून ये-जा करणारे प्रवाशांना बसेस अपुऱ्या पडतात़ परिणामी, खाजगी अवैैध प्रवासी वाहतूक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
आष्टा मोड हे चौरस्त्यावरील गाव असून, येथून नांदेड, लातूर, उदगीर, रेणापूर या तालुक्याकडे जाता येते़ परंतु, येथील थांब्यावर बस थांबत नाहीत़ तसेच आष्टामोड जवळ जानवळ, गांजूर ही गावे आहेत़
आता बसेस स्थानकात़़़
याबाबत चाकूरचे आगारप्रमुख एम़बी़जाधव यांच्याशी संपर्क साधला असता बसस्थानकात बस थांबत नसतील तर संबंधित वाहक-चालकांना सूचना देण्यात येतील़ तरीही प्रश्न तसाच राहिला तर प्रवाशांनी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा़ त्यानुसार संबंधित वाहक-चालकांवर कार्यवाही केली जाईल़