शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने दूषित पाणीपुरवठात महापालिकेला धरले जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 21:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक्यात टाकले होते, असे म्हणत मनपाला जबाबदार धरले आहे. तसेच यातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.


विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात मागील आठवड्यात पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळल्यामुळे विद्यार्थिनींना ऐन परीक्षेच्या काळात दवाखान्यात दाखल व्हावे लागले. या प्रकाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला आजारी विद्यार्थिनींची संख्या वाढत गेल्याने लक्ष द्यावे लागले. मागील आठवड्यात सोमवारी (दि.२९ एप्रिल) कुलसचिवांनी एक दिवसाच्या आत पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी देण्यात येतील. घडलेल्या गंभीर प्रकाराची चौकशी तात्काळ केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. स्मिता अवचार, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. योगिता होके-पाटील यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींची भेट घेतल्यानंतर प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. यानंतर वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यात दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली.

तेव्हा प्रकरण दाबण्यासाठी काही विद्यार्थी संघटना, प्रशासनातील अधिकारी आणि व्यवस्थापन परिषद सदस्याने पडद्याआड प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. दौºयावरून परतलेले कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली असता, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करता येईल, असे उत्तर दिले. यावेळी उपस्थित प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी विद्यार्थिनी वसतिगृहात महापालिकेकडून मिळणारे पाणीच टाकले. त्याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणचे पाणी टाकले नसल्याचे स्पष्ट करून महापालिकेकडे बोट दाखविले आहे.


कुलसचिवांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण योग्यपणे हाताळण्यात आले नाही. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यार्थी संघटनांनी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याविषयीचे निवेदनही कुलगुरूंना देण्यात आले. मात्र डॉ. पांडे यांना पाठीशी घालण्यासाठी एक व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठातील अधिकारी आणि एका गटातील काही पदाधिकारी यांनी मोहीम राबविली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा प्रकरणात कोणावरीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद