शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात विद्यापीठाकडून दिरंगाई

By admin | Updated: June 10, 2014 01:00 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अभियांत्रिकीचे पेपर तपासणीत झालेल्या चुका दुरुस्त करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अभियांत्रिकीचे पेपर तपासणीत झालेल्या चुका दुरुस्त करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, निकालाची वाट बघत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतलेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षांचा निकाल मार्च-एप्रिलमध्ये जाहीर झाला. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत, त्यांनी विद्यापीठाकडे रिड्रेसल अर्ज (पुनर्मूल्यांकन) सादर केले. औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असलेल्या मयूर श्रीनिवास याला त्याने सोडविलेल्या प्रश्नाच्या उत्तराला गुण न दिल्याचे तसेच त्याने ज्या प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही त्याला गुण देण्यात आल्याचे समोर आले होते. परिणामी, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड या विषयात नापास झाला.
एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी सय्यद इद्रीस अहेमद याची उत्तरपत्रिका तपासतानाही चुका झाल्या आहेत. त्याची उत्तरपत्रिका अर्धवट तपासण्यात आली. त्यामुळे तो नापास झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी रिड्रेसलसाठी अर्ज केल्यानंतर झालेल्या चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. रिड्रेसलचा निकाल परीक्षा सुरू होण्यापूर्वी जाहीर होणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांच्या अर्जावर निर्णय घेण्यास विद्यापीठ परीक्षा विभागाकडून दिरंगाई झाली. परिणामी, त्या विद्यार्थ्यांना २ जूनपासून सुरू झालेली परीक्षा द्यावी लागली. रिड्रेसलचा निकाल दोन महिन्यांत लावणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. विद्यापीठाने घाईघाईने रिड्रेसलचा निकाल घोषित केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
सकारात्मक विचार
याविषयी परीक्षा विभागातील विशेष कार्य अधिकारी डॉ. सूर्यकांत जगदाळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्यामुळे त्यांचा सकारात्मक विचार करून त्या तक्रार निवारण समितीकडे पाठविण्यात आल्या आहेत.