विद्यापीठ कर्मचाऱ्यांनाही आता आगाऊ वेतनवाढ

By Admin | Updated: December 16, 2014 01:08 IST2014-12-16T00:51:28+5:302014-12-16T01:08:16+5:30

औरंगाबाद : शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना

University employees now pay advance wages | विद्यापीठ कर्मचाऱ्यांनाही आता आगाऊ वेतनवाढ

विद्यापीठ कर्मचाऱ्यांनाही आता आगाऊ वेतनवाढ


औरंगाबाद : शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याची ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग, तसेच उस्मानाबाद उपकेंद्राला एक परिपत्रक जारी केले आहे. आगाऊ वेतनवाढ ही २०१२, २०१३ आणि २०१४ या तीन वर्षांसाठी प्रस्तावित आहे. त्यासाठी विद्यापीठातील विविध विभाग व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कार्यरत वर्ग-१, २, ३ व ४ कर्मचाऱ्यांपैकी ज्याचे काम अत्युत्कृष्ट आहे, अशा दोन कर्मचाऱ्यांची नावे कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. नावांची शिफारस ही अत्यंत गोपनीय ठेवण्याची सूचनाही कुलसचिव कार्यालयाने केली
आहे.
कुलसचिवांकडे प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिफारसी एकत्रितपणे उच्च शिक्षण विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ४
आगाऊ वेतनवाढीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची आजपर्यंतची सेवा, त्यांच्या वेतनश्रेणीतील वेतन हे कोणत्या टप्प्यावर आहे, एखाद्या कर्मचाऱ्यास १ आॅक्टोबरपूर्वी पदोन्नती मिळाली असेल व त्याचे पदोन्नती मिळण्यापूर्वीचे काम अत्यंत चांगले असेल, अशाच कर्मचाऱ्यांच्या नावांची शिफारस स्वीकारली जाणार आहे.
४संबंधित विभागप्रमुख अथवा प्राचार्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करताना कर्मचाऱ्याने बजावलेल्या नावीन्यपूर्ण कार्याबद्दल दोन परिच्छेदामध्ये लिहून पाठविणे बंधनकारक आहे.

Web Title: University employees now pay advance wages