शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

महिला समृद्धी योजनेंतर्गत २२० महिलांना सव्वा कोटी कर्ज वाटप

By admin | Updated: July 3, 2014 00:16 IST

अंबाजोगाई: साठे विकास महामंडळाकडून केज मतदार संघातील मातंग समाजाच्या महिलांसाठी महिला समृद्धी योजनअंतर्गत २२० महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

अंबाजोगाई: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून केज मतदार संघातील मातंग समाजाच्या महिलांसाठी महिला समृद्धी योजनअंतर्गत २२० महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांच्या हस्ते पार पडला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेऊन मातंग समाजाने आपली आर्थिक प्रगती साधावी. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी दिली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया होते. तर व्यासपीठावर आ. पृथ्वीराज साठे, अ‍ॅड. मेघराज आडसकर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, विलास सोनवणे, मदन यादव, अमर देशमुख, तारामती उबाळे, नेताजी शिंदे, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण, राजेभाऊ औताडे, किशोर परदेशी, गिरीधारीलाल भराडिया, बबन लोमटे, मधुकर काचगुंडे, तहसीलदार राहुल पाटील उपस्थित होते. महिलांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महामंडळाचा ५० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. महामंडळ मातंग समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून महिलांना लघु उद्योग उभारणीसाठी महामंडळाच्या प्रयत्नातून केंद्र सरकारकडूनही १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे. यातून ६८ कोटी रुपये महिलांना लघु उद्योग उभारण्यासाठी देण्यात आले आहेत. आ. पृथ्वीराज साठे यांचे भाषण झाले. अध्यक्षीय समारोप डॉ. लोहिया यांनी केला. यावेळी बेटी बचाव अभियानचे धिमंत राष्ट्रपाल यांना मोटारसायकल भेट दिली. (वार्ताहर)