शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैैध वाहतूक !

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक होत असून, यातून एसटीला दिवसाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक होत असून, यातून एसटीला दिवसाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे. असे असतानाही अशा वाहनांवर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. या अवैध वाहतुकीने शेकडो लोकांचा बळी गेला आहे. उस्मानाबादसोबतच वाशी, भूम, कळंब, लोहारा, उमरगा, परंडा, तुळजापूर आदी तालुक्यांमध्ये हेच चित्र दिसते. या वाहनधारकांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न सदरील विदारक स्थिती पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना पडला आहे.उस्मानाबाद शहरातून बार्शीनाका, बसस्थानक परिसर, सांजारोड , आदी ठिकाणाहून अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतुकीने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असला तरी प्रवाशी गावाला जाण्यासाठी एसटी ने जाता खाजगी वाहनांचा आधार घेत आहे. उस्मानाबाद शहरात सकाळी बसस्थानक समोर अवैध वाहतुकीचे काळीपिवळी, अॉटो थांबत असतात. हे वाहन चालक प्रवाशांना तुम्हाला कुठे जायचे सांगा आमची गाडी त्याच गावाला चाली असे म्हणुन सरास अवैध प्रवासी वाहतूक करीत असतात. या सर्व घटना वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसमोर होत असताना यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही हे विशेष. प्रवासी एसटीला जाणे पसंत करत नाहीत, कारण खाजगी वाहनापेक्षा एसटीचे तिकीट जास्त असल्याने ते प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेत असतात. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना गावाकडे जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असतो. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, येडशी, तेर, बेंबळी इ. भागात सरास अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. अवैध वाहतुकी मध्ये प्रवाशा बरोबर सिलेंडर , पेट्रोल व डिझेल या पदार्थाची अवैध वाहतुकी मधून घेऊन जात असल्याने स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही महिन्यात जिल्ह्यात मोठया प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असले तरी अवैध वाहतूक मात्र कमी झालेली नाही.बसच्या फेऱ्या कमीअवैध वाहतूक करणारे वाहनाचालक पोलिस प्रशासनला चिरीमिरी देत असल्याने सरास अवैध वाहतूक सुरु असल्याचे प्रवासी सांगतात. या अवैध वाहतुकीने काही गावातील बसच्या फेऱ्या ही कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या गावी जाण्यासाठी अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याचे प्रवासी सांगतात.राजकीय दबावअवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस किंवा आरटीओच्या पथकाने कारवाई केली तर राजकीय नेत्यांचे फोन येत असतात. संबधित वाहन सोडून द्या व त्याला दंड करु नका असे फोन येत असतात. त्यामुळे पोलिसांना अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकास सोडून द्यावे लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.३५९ वाहनांवर कारवाईचा बडगाउस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या ३५९ वाहनावर आरटीओ कारवाई केली असून ५६ वाहनांचे रजिस्टे्रशन निलंबित केले आहे. २८ वाहनचालकांचे ड्रायव्हीग लायसन निलंबित केले. तसेच टॅक्स व दंड मिळून ३ लाख ७४ हजार ५२२ रुपये वसूल करण्यात आल्याचे आरटीओच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.