शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

युनानी, आयुर्वेद डॉक्टरही करतील अ‍ॅलोपथीची प्रॅक्टिस

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

औरंगाबाद : आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याच्या परवानगीवर आता कायद्याचेही शिक्कामोर्तब झाले.

औरंगाबाद : आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याच्या परवानगीवर आता कायद्याचेही शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष तथा भारतीय चिकित्सा सेंट्रल कौन्सिलचे सदस्य डॉ. सुधाकर मोहिते यांनी रविवारी पत्रकार परिषदेतदिली. डॉ. मोहिते म्हणाले की, आयुर्वेद आणि युनानीचा अभ्यासक्रम हा सर्वसमावेशक आहे. त्यामुळे या पॅथीच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणारा अध्यादेश १९९२, १९९८, २००४ आणि २००९ मध्ये काढला होता. मात्र, अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, अशी संघटनेची मागणी होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करावी, यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा केला.सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्टमध्ये सुधारणा विधेयक मंजूर केले. यामुळे निमा संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे, असे मोहिते म्हणाले. आतापर्यंत युनानी आणि आयुर्वेद डॉक्टर शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, शालेय आरोग्य तपासणी अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहेत. केवळ कायद्याचे संरक्षण आवश्यक होते, त्यासाठी ही मागणी लावून धरली होती, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे प्रवक्ता डॉ. गिरीश डागा, डॉ. जगदीश गिते, डॉ. आर.एम. मुंदडा, डॉ. प्रकाश न्यायाधीश, डॉ. सुनील वानखेडे, डॉ. मिलिंद पोळ, डॉ. विनय धर्माधिकारी, डॉ. एस.एल. राठी, डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते.