शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीविरुद्धचा आवाज दडपण्याचा प्रकार

By admin | Updated: May 29, 2014 00:29 IST

उस्मानाबाद : बचतगट तसेच इतर उपक्रमाच्या माध्यमातून महिला जागृत होत आहेत.

उस्मानाबाद : बचतगट तसेच इतर उपक्रमाच्या माध्यमातून महिला जागृत होत आहेत. अशा वेळी कनगरा येथे घडलेली घटना म्हणजे महिलांनी दारूबंदीविरुद्ध उठविलेल्या आवाजाला दडपण्याचा प्रकार असल्याचे जि. प. सदस्या अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. बुधवारी सकाळी त्यांनी कनगरा येथे जाऊन मारहाण झालेल्या व्यक्तींची तसेच त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेमुळे पुढील काळात जिल्ह्यातील महिला दारूबंदीसाठी पुढाकार घेण्यास धजावणार नसल्याची भीती यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणातील दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी पोलिस महानिरीक्षक जगन्नाथ यांच्याकडे केली. अत्याचार करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची मराठवाड्याबाहेरील अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी, फरार दारूविक्रेत्याला तात्काळ अटक करावी, निरपराध ग्रामस्थांची सुटका करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या. त्यांच्या समवेत नगराध्यक्ष रेविताताई बनसोडे, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे, शहराध्यक्ष वंदनाताई डोके आदी उपस्थित होत्या. ‘सीआयडी’ चौकशीची मागणी महिलांनी वारंवार निवेदने देऊनही अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. हा प्रकार गंभीर आहे. उलटपक्षी दारूबंदीची मागणी करणार्‍या ग्रामस्थावर अमानुष अत्याचार करून पोलिसांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रदीप खंडापूरकर, विलास शेंडगे, अ‍ॅड. एस. एस. सीतापुरे, अतुल बांगर, विशाल माने, शेख जमीर आदींनी निवेदनादरे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. मनसेचे लाक्षणिक आंदोलन उस्मानाबाद : कनगरा येथील नागरिकांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले़ दारूबंदीसाठी सहकार्य न करणार्‍या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकांना बेदम मारहाण करणार्‍या पोलिसांच्या रझाकारी कारवाईचा निषेध करण्यात आला आहे़ अंनिसकडून निषेध उस्मानाबाद- कनगरा मारहाण प्रकरणी पोलिसांच्या रझाकारी वृत्तीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी एम. डी. देशमुख, भाग्यश्री वाघमारे,बालाजी तांबे, सत्यजित सिरसट, अ‍ॅड. देविदास वडगावकर, शीतल वाघमारे, अ‍ॅड. गोपाळ पाकले यांनी दारूबंदीचे कार्य करणार्‍यांना पोलिस प्रशासनाने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.