शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

By admin | Updated: May 30, 2014 00:28 IST

देगलूर : शहापूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टरला दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. केकान यांनी २८ मे रोजी सुनावली आहे.

दोन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा देगलूर : वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परवाना नोंदणी नसताना तालुक्यातील शहापूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टरला दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. केकान यांनी २८ मे रोजी सुनावली आहे. संबंधितांनी यापुढे आपल्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावण्याबरोबरच वैद्यकीय व्यवसायास प्रतिबंध घातल्याचे निकालपत्रात नमूद केले आहे. देगलूर न्यायालयातील सरकारी वकील अ‍ॅड. बी. बी. जाधव यांनी ही माहिती दिली. मारोती ऊर्फ बाबू विठ्ठल पोतदार (रा. शहापूर) असे या बोगस डॉक्टरचे नाव असून ४ नोव्हेंबर २००६ रोजी तत्कलिन पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिस उपनिरीक्षक झुंबररराव लोंढे यांनी पोतदार याच्या दवाखान्याची पंचासमक्ष तपासणी करुन वैद्यकीय व्यवसायाबाबतची कागदपत्रे मागितली. सध्या आपणाकडे कागदपत्रे उपलब्ध नसून दोन दिवसांत ती दाखल करण्याचे पोतदार याने सांगितले. या प्रकरणी न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पोलिस उपनिरीक्षक मुकूंद ठाकरे व तपासी अधिकारी झुंबरराव लोंढे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपीने न्यायालयात वैद्यकीय व्यवसाय परवाना व संबंधित कागदपत्रे दाखल केली नाहीत. याशिवाय गावातील राजकारणामुळे आपल्याविरुद्ध कारवाई झाल्याचे जबाबामध्ये सांगितले. सदर प्रकरणात झालेला साक्षीपुरावा, सरकार पक्षाच्या युक्तिवाद व प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन न्यायाधीश एस. पी. केकान यांनी बाबू पोतदार यास महाराष्टÑ मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट १९६१ चे कलम ३३ नुसार दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शासनाच्या तीने अ‍ॅड. बी. बी. जाधव यांनी काम पाहिले. (वार्ताहर) देगलूर न्यायालयाचा निकाल शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय परवाना अशी कोणतीच कागदपत्रे दाखल न केल्यामुळे देगलूर पोलिस ठाण्यात बाबू पोतदार याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० व महाराष्टÑ मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट १९६१, कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करुन तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल झाले.