शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

By admin | Updated: December 2, 2014 01:09 IST

औरंगाबाद : शहरात मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दोन मंगळसूत्र मोटारसायकलस्वार चोरट्यांनी तोडून नेले.


औरंगाबाद : शहरात मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दोन मंगळसूत्र मोटारसायकलस्वार चोरट्यांनी तोडून नेले. या घटनेमुळे महिलांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा प्रकारे दोन दिवसांत मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.
स्वप्ननगरी येथील रहिवासी स्वप्ना रिपाल जांगीड (३०) या आपल्या घरापासून काही अंतरावर वॉकिंगसाठी गेल्या होत्या. समोरून आलेली एक मोटारसायकल अचानक त्यांच्याजवळ येऊन थांबली. मोटारसायकलवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर ते चोरटे धूमस्टाईलने निघून गेले. त्यांनी आरडाओरडी केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. ही घटना सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
दुसरी घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिडको एन-४ येथे घडली. एन-४ येथील रहिवासी महिला रात्री पायी जात असताना मोपेडस्वार दोन चोरट्यांनी आठ तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविले. सदर महिलेने रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती.
या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती कळवून तातडीने नाकाबंदी सुरू
केली. ४
रविवारी जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेले होते. त्या
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.