वेरूळ घाटातील नाल्यात पडून दुचाकीस्वार जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:23 IST2019-08-01T18:22:36+5:302019-08-01T18:23:58+5:30

नाल्यावरील पुलास दुचाकीने जोरदार धडक दिली.

Two-wheeler was killed on the spot by falling into a drain in a Verul Ghat | वेरूळ घाटातील नाल्यात पडून दुचाकीस्वार जागीच ठार 

वेरूळ घाटातील नाल्यात पडून दुचाकीस्वार जागीच ठार 

खुलताबाद (औरंगाबाद ) : कन्नडकडे जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराचा वेरूळ घाटातील नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१ ) सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली. गोविंद हेमा राठोड असे मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंद हेमा राठोड (38  रा. भारंबावाडी ता.कन्नड ) हे आज दुपारी औरंगाबादवरून कन्नडकडे दुचाकीवरून येत होते. वेरूळ घाटात खुलताबाद टी पॉईंट जवळील एका नाल्यावरील पुलास दुचाकीने जोरदार धडक दिली. यामुळे ते दुचाकीसह खोल नाल्यात पडले. उंचावरून पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागला, यातच त्यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल केला असून अपघाताची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. 
 

Web Title: Two-wheeler was killed on the spot by falling into a drain in a Verul Ghat