शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच मार्गावर २ तिकीटदर

By admin | Updated: October 31, 2014 00:35 IST

उदगीर : बीदर रोडवरील रेल्वेगेट जवळील उड्डाणपुलाच्या कामामुळे दूर अंतरावरुन जावे लागत असल्याने एसटीकडून ६ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती़

उदगीर : बीदर रोडवरील रेल्वेगेट जवळील उड्डाणपुलाच्या कामामुळे दूर अंतरावरुन जावे लागत असल्याने एसटीकडून ६ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती़ त्यामुळे जवळचा रस्ता दिल्यानंतर निलंगा आगाराने दर कमी केले़ परंतु, उदगीर आगाराकडून मात्र पूर्वीच्याच दराने ‘वसुली’ सुरु आहे़ एका मंडळाच्या एसटीकडून एकाच मार्गावर दोन वेगवेगळे तिकिटदर आकारले जात असल्याने प्रवासी संतापले आहेत़बीदर रोडवरील उड्डाण पुलाच्या कामामुळे एसटीला रिंग रोड उपलब्ध करुन देण्यात आला होता़ त्याअनुषंगाने एसटीकडून या मार्गावर ६ रुपये तिकिट दर वाढविण्यात आले होते़ परंतु, प्रवाश्यांची ओरड लक्षात घेऊन एसटीला शेल्हाळ मार्ग खुला करुन देण्यात आला आहे़ एसटीने या मार्गाचा वापर केल्यास ६ रुपयांऐवजी केवळ ३ रुपये वाढीव तिकिट घ्यावे लागणार आहे़ यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच निलंगा आगाराने तात्काळ कार्यवाही करीत तिकिटदरात ३ रुपये कपात केली़ गेल्या आठवडा भरापासून निलंगा आगाराकडून ६ रुपयांऐवजी केवळ ३ रुपये जास्तीचे आकारले जात आहेत़ असे असतानाही उदगीर आगाराने मात्र त्याकडे कानाडोळा करीत प्रवाश्यांची लूट सुरुच ठेवली आहे़ या आगाराच्या एसटीकडून अजूनही ६ रुपये जास्तीचे आकारले जात आहे़ एकाच महामंडळाच्या बसेसद्वारे एकाच मार्गावर असे वेगवेगळे तिकिटदर पाहून प्रवासी संतापले आहेत़ आगाराचे उत्पन्न वाढवून शाबासकी मिळवू पाहण्याच्या नादात उदगीर आगारातील अधिकाऱ्यांनी प्रवाश्यांच्या खिश्याला बसणारी झळ व त्यांचा संताप जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप प्रवासी अमोल जिवणे, राजकुमार मुर्के, चेतन मिटकरी यांनी केला आहे़(वार्ताहर)