शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

दोन नगरसेवक भाजपामध्ये; सेनेसमोर नवे आव्हान

By admin | Updated: October 6, 2014 00:43 IST

औरंगाबाद : दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे.

औरंगाबाद : दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. भाजपाचा हा डाव उलटविण्यासाठी सेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.गुलमंडीच्या नगरसेविका प्रीती तोतला, धावणी मोहल्ल्याचे जगदीश सिद्ध यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. या दोघांचेही वॉर्ड मध्य मतदारसंघात येतात. हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेतून भाजपामध्ये गेलेले आणि मध्यची उमेदवारी मिळविलेले किशनचंद तनवाणी यांचे समर्थक आहेत. यामुळे प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हा संघर्ष आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. तनवाणी यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर जगदीश सिद्ध आणि प्रीती तोतला हेदेखील तनवाणी यांच्यासोबत जातील, असे गृहीत धरण्यात आले होते. त्याप्रमाणेच घडले. प्रीती तोतला यांनी काही दिवस प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचार कार्यालयांत हजेरीही लावली होती. जगदीश सिद्ध हे तनवाणी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. महापालिकेच्या राजकारणात खा. चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांनी आपली कायम कोंडी केली, असा सिद्ध यांचा समज आहे. लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी हक्क असतानाही डावलले गेल्याची सिद्ध यांची भावना होती. त्यामुळे स्थानिक सेना नेतृत्वावर ते नाराज होते. सिद्ध हे धावणी मोहल्ल्यातून सातत्याने निवडून आले आहेत. शिवसेनेने तनवाणी यांना गद्दार असे संबोधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तनवाणी यांनीही शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिद्ध आणि तोतला यांना भाजपामध्ये घेऊन जैस्वाल यांना शह देण्याचा प्रयत्न तनवाणी यांनी केल्याचे दिसत आहे. सिद्ध यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नगरसेवकपदाच्या तीन टर्मपासून मला मनपात पद दिले नाही. नवीन लोकांंना पदे दिली. शिवसैनिक नसलेल्यांनाही तिकीट देऊन ते निवडून आल्यानंतर त्यांनाही पदे वाटली गेली. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्यावर सतत अन्यायच केला. लोकसभा निवडणुकीत माझ्या वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवाराला तीन हजारांची आघाडी दिली तरीही मी काम केले नसल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे नाईलाजास्तव पक्ष सोडावा लागला.