शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाकडून लाच घेताना दोन पोलीस हवालदारांना पकडले

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

औरंगाबाद : तरुणास चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ५ हजार रुपयांची लाच घेणार्‍या दोन पोलीस हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सापळा रचून बुधवारी रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : तरुणास चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ५ हजार रुपयांची लाच घेणार्‍या दोन पोलीस हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सापळा रचून बुधवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश नामदेव दांडगे (४८, रा. पोलीस कॉलनी) आणि अ‍ॅन्थोनी लुईस फ्रान्सिस (३४, रा. न्यू नंदनवन कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, फिर्यादी शेख अमीर आणि मोहसीन पठाण हे मित्र आहेत. मोहसीनला पैशाची गरज असल्याने त्याने त्याची मोटारसायकल विक्रीसाठी काढली होती. मात्र, मोटारसायकलला ग्राहक मिळत नव्हते. दरम्यान, त्याने अमीरकडून काही रक्कम हातउसनी घेतली आणि त्याची मोटारसायकल वापरण्यास दिली. चार दिवसांनंतर पैसे परत न केल्यास मोटारसायकल तुझ्या मालकीची होईल, असे अमीरला सांगितले. त्यांनी या व्यवहारासंबंधी लेखी करार केला होता. दरम्यान, वेळेत रक्कम परत न करू शकल्याने अमीर मोटारसायकल वापरत होता. मात्र, गाडीच्या मालकीहक्काचे पेपर मोहसीनच्या नावे होते. त्याने त्याच्या ओळखीचा पोलीस हवालदार अ‍ॅन्थोनी लुईस यांची भेट घेऊन अमीरकडून मोटारसायकल परत मिळवून देण्याची विनंती केली. अ‍ॅन्थोनी यांनी ही बाब पोहेकॉ. प्रकाश दांडगे यांना सांगितली. त्यांनी मोहसीनकडून अमीर विरोधात एक अर्ज घेतला. या अर्जाची मात्र, पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंद केली नाही. परस्पर त्यांनी अमीरला बोलावून घेतले आणि मोटारसायकल चोरीचा गुन्हा तुझ्यावर दाखल होऊ शकतो, अशी धमकी त्यांनी दिली. गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच त्यांनी मागितली. एवढी रक्कम देणे अशक्य असल्याचे अमीरने सांगितल्याने शेवटी त्यांच्यात पाच हजार रुपयांची तडजोड झाली. अमीर यांनी दोन्ही हवालदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या कॉर्नरवर सापळा रचला. त्यावेळी आरोपी पोलिसांच्या वतीने एका खाजगी व्यक्तीने अमीरकडून पाच हजार रुपये लाच घेतली. त्यानंतर आरोपी पोलिसांना अटक करण्यात आली. ही कामगिरी अप्पर अधीक्षक बी. बी. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुरेश वानखेडे, प्रताप शिकारे, प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक ए. व्ही. रायकर, कर्मचारी कैलास कामठे, प्रमोद पाटील, हरिभाऊ कुºहे, श्रीराम नांदुरे, अजय आवले, सुनील फेपाळे, नितीश घोडके, चालक शेख मतीन यांनी केली.