सव्वातीन लाखांची धोंडीपुऱ्यात घरफोडी

By Admin | Updated: July 12, 2014 01:13 IST2014-07-11T23:37:51+5:302014-07-12T01:13:10+5:30

बीड: शहरातील धोंडीपुरा भागातील देशपांडे यांच्या घरातील चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याची घटना घडली.

Twenty-five lakhs burglars in Dhondipur | सव्वातीन लाखांची धोंडीपुऱ्यात घरफोडी

सव्वातीन लाखांची धोंडीपुऱ्यात घरफोडी

बीड: शहरातील धोंडीपुरा भागातील देशपांडे यांच्या घरातील चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा दुकानदार श्रीकांत अनंतराव देशपांडे हे गुरुवारी घरी झोपले होते. रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान, चोरट्यांनी संरक्षक भिंतीवरुन उडी मारली व घरात प्रवेश केला. पर्स मध्ये ठेवलेले पाच तोळे पाटल्या, चार तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे नेकलेस, दीड तोळ्याचे लॉकेट, दोन तोळ्याच्या अंगठ्या व बाराशे रुपयांची रोख रक्कम असा एकूण सव्वातीन लाख रुपंयाचा माल चोरुन नेला. या प्रकरणी देशपांडे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
धोंडीपुरा भागात झालेल्या घरफोडीत नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले
यापूर्वी देखील धोंडीपुऱ्यात सराफा व्यापाऱ्याला लाखोंना लुटण्यात आले होते

Web Title: Twenty-five lakhs burglars in Dhondipur