शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

चोंढी टोकनाका बंद

By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST

हिंगोली : औंढा नागनाथ - वसमत या रस्त्यावर चोंढीजवळ असलेला टोलनाका सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.

हिंगोली : औंढा नागनाथ - वसमत या रस्त्यावर चोंढीजवळ असलेला टोलनाका सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. त्यामुळे यापुढे वाहनधारकांना येथे टोल भरण्याची गरज नाही. औंढा नागनाथ- वसमत रस्त्याचे बीओटी तत्वावर खासगी कंत्राटदाराकडून काम करण्यात आले होते. २६ फेब्रुवारी २००३ पासून चोंढीजवळ मे. कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीकडून या खासगी तत्वावर करण्यात आलेल्या रस्त्याच्या मोबदल्यापोटी टोल वसूली सुरू करण्यात आली होती. २६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत ही टोल वसूली सुरू राहणार होती; परंतु राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्यातील काही टोल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये औंढा- वसमत रस्त्यावरील चोंढी टोलनाक्याचा समावेश होता. या अनुषंगाने २७ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून हा टोलनाका बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता १ जुलैपासून या रस्त्यावरील टोल वसूली बंद होणार आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)११ वर्षांपासूनची वसूली बंदजिल्ह्यात औंढा नागनाथ - वसमत या रस्त्यावर २० कि.मी. अंतराचे काम ५ कोटी ५० लाख रुपये खर्चून बीओटी तत्वावर करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामापोटी २६ फेब्रुवारी २००३ पासून खासगी कंपनीकडून सुरू होती टोल वसूली.२६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत चालणार होती टोल वसूली.राज्य शासनाने गेल्या महिन्यात राज्यातील कमी कालावधी राहिलेले टोल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील चोंढी येथील टोलनाक्याचा समावेश होता.