शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक झाडावर आदळून दोघे ठार

By admin | Updated: March 1, 2016 23:48 IST

वसमत/ शिरडशहापूर : औंढा- वसमत रस्त्यावरील भेंडेगाव शिवारात मंगळवारी सकाळी ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोघे जागीच ठार झाले.

वसमत/ शिरडशहापूर : औंढा- वसमत रस्त्यावरील भेंडेगाव शिवारात मंगळवारी सकाळी ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोघे जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडावर आदळून हा अपघात झाला असल्याचे वृत्त आहे. कामारेड्डीहून तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक (क्र.एपी२५- व्ही. ३९८१) सुरतकडे जाण्यास निघाला होता. हा ट्रक वसमत तालुक्यातून जात असताना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास वसमत-औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ उलटला. रस्त्याच्या कडेच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील दोघे जागीच ठार झाले. शेख मजहर शेख महेबूब (वय ३५, रा. कामारेड्डी) व शे वाजीद शेख नूर (वय ३३, रा. सारंगपूर )अशी दुघर्टनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.घटनेचे वृत्त समजताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील नाईक, रूपेश गरूड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयताची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत प्रकरण नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)दुचाकी अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू डोंगरकडा : नांदेड- हिंगोली महामार्गावरील चिंचवाडी शिवारात मोटारसायकलवरून पाणी आणण्यासाठी जात असताना दुसऱ्या मोटारसायकल क्र. एमएच २६- १९१६ ने २९ फेब्रुवारी रोजी जोराची धडक दिली. यात एक शिक्षक जखमी तर त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. डोंगरकडा परिसरातील वरुड ग्रामपंचायतीअंतर्गत चिंचवाडी येथे मागील बऱ्याच दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंचवाडी येथील शिक्षक मुंगाजी खरवडे व त्यांची मुलगी आश्विनी मुंगाजी खरवडे (वय १७) हे दोघेही पाणी आणण्यासाठी मोटारसायकलवरून जाताना नांदेडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल क्र. एमएच २६- १९१६ चीे धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान १ मार्च रोजी सकाळी पाचच्या सुमारास आश्विनीचा मृत्यू झाला. ती कै. बापूराव देशमुख महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. सदरील विद्यार्थिनीच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. डोंगरकडा फाट्यावरील व्यापाऱ्यांनी दुकाने एक तास बंद ठेवली होती. या विद्यार्थिनीवर तिच्या मूळ गावी जामगव्हाण येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास जमादार शंकर इंगोले करीत आहेत.