दौलताबाद घाटात ट्रक कोसळला

By Admin | Updated: December 19, 2014 00:58 IST2014-12-19T00:06:15+5:302014-12-19T00:58:48+5:30

खुलताबाद/दौलताबाद : घाटात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ट्रक कठडे तोडून घाटात उलटला

The truck collapsed in Daulatabad Ghat | दौलताबाद घाटात ट्रक कोसळला

दौलताबाद घाटात ट्रक कोसळला

खुलताबाद/दौलताबाद : घाटात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ट्रक कठडे तोडून घाटात उलटला. परंतु नशीब बलवत्तर म्हणून हा ट्रक दरीत कोसळला नाही. ट्रक अर्धा रस्त्यावर व अर्धा दरीच्या दिशेने राहिला. जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. यामुळे वाहतुकीस खोळंबा झाला.
सुरत येथून पशुखाद्य भरून हा ट्रक (क्र. एम.एच. २६ एच-७५३६) नगर जिल्ह्यातील सुपा येथे जात असताना कठडा तोडून दरीच्या दिशेने
लटकला. या अपघातात ट्रकचालक प्रेमसिंग राजपूत (४०) रा. गल्लेबोरगाव, ता. कन्नड हा किरकोळ जखमी झाला.
दौलताबाद येथे यात्रा सुरू असल्याने छावणी वाहतूक विभागाचे सहायक फौजदार ए. के. जगधने, शिवाजी छडीदार, अनिल पवार, गणेश गायकवाड हे बंदोबस्तासाठी आले होते.
अपघात घडताच ते तातडीने घाटात पोहोचले. त्यांनी चालकाला सुखरूप बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली. त्यांना दौलताबाद पोलीस स्टेशनचे बिटमार्शल बी. आर. ठोंबरे, एन.टी. जाखान यांनी मदत केली.

Web Title: The truck collapsed in Daulatabad Ghat