रस्त्यावरील खड्ड्यात झाडे

By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-13T23:19:29+5:302014-07-14T01:01:10+5:30

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Trees in the pothole on the road | रस्त्यावरील खड्ड्यात झाडे

रस्त्यावरील खड्ड्यात झाडे

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असताना पालिकेकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी या खड्ड्यांत बेशरमाच्या झाडांची लागवड करून आंदोलन करण्यात आले.
याबाबत भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले, शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे स्थानिक नागरिकांसोबतच बाहेरगावाहून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचेही मोठे हाल होत आहेत. पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. पालिकेच्या या कारभाराचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात महेश गरड, विकास मलबा, उमेश गवते, प्रसाद पाणबुडे, नितीन भांजी, सचिन रसाळ, सुधीर पवार, अक्षय साळुंके, आप्पा चोपदार, सचिन अमृतराव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)

Web Title: Trees in the pothole on the road