शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

'एका लग्नाहून दुसऱ्या लग्नाकडे जाताना घात झाला!'; पत्नीसमोरच पतीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:44 IST

झाल्टा फाट्यावरील विवाह आटोपला, पण कोलठाणवाडी गाठण्यापूर्वीच काळाने गाठले; सुसाट ट्रकने दांपत्याचा संसार उध्वस्त केला.

छत्रपती संभाजीनगर: शहर पळशी येथील रहिवासी अस्लम उस्मान शेख (३५) हे पत्नी शमा यांच्यासह नातलगांच्या विवाह सोहळ्यासाठी निघाले असताना केम्ब्रिज-सावंगी बायपासवरील गोपाळपूर शिवारात रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर काळाने घाला घातला. समोरून आलेल्या सुसाट ट्रकने (MH 25 AJ 6041) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अस्लम यांचा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी शमा या दूरवर फेकल्या गेल्यामुळे सुदैवाने बचावल्या.

दोन लग्नांमधील दुर्दैवी प्रवासअस्लम शेख हे खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. २६ एप्रिल रोजी झाल्टा फाटा येथील एका लग्नाचे कार्य आटोपल्यानंतर हे दांपत्य कोलठाणवाडी येथील दुसऱ्या एका विवाह सोहळ्याकडे जात होते. मात्र, वाटेतच सुसाट ट्रकने त्यांच्या आनंदावर विरजण घातले. या अपघातामुळे अस्लम यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि पत्नी असा परिवार उघड्यावर पडला आहे.

चालक फरार, गुन्हा दाखलअपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. शमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या पसार चालकाचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Man Dies in Truck Accident En Route to Wedding

Web Summary : A man died instantly near Sambhajinagar after a speeding truck hit his motorcycle. He was traveling with his wife to a wedding. The wife survived. The driver fled and police are investigating. The deceased leaves behind a wife and four children.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात