शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने ऊसतोड मजुरांचे टॅक्टर ट्रॉलीसह पुलावरुन कोसळले ; १ ठार ८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:13 IST

The tractor accident at Khamb river bridge : मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचे कुटुंबीय लांझी शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे उसतोड मजुर ट्रॅक्टरमधून घरी जात होते.

ठळक मुद्देलांझीजवळील खामनदी पुलावरील घटना जखमीत दोन चिमुकल्याचा समावेश

वाळूज महानगर : ऊसतोड मुजरांना घेऊन जाणा-या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. तर ८ जण जखमी झाले असून, यात २ बालकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लांझीजवळ घडली. संदीप दिलीप घोरपडे (३० रा.कचनेर) असे मृताचे नाव आहे. तर अर्चना प्रभाकर शरणागत (२५), प्रभाकर रामनाथ घोरपडे (३०), शिवनाथ रामनाथ शरणागत (२५), मिनाबाई प्रभाकर शरणागत (३०), स्वराज शिवनाथ शरणागत, कानिफनाथ शरणागत, सुहानी संदीप घोरपडे हे ७ तर साहिल शिवनाथ शरणागत (६), कल्याणी प्रभाकर शरणागत (८) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचे कुटुंबीय लांझी शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे उसतोड मजुर ट्रॅक्टरमधून घरी जात होते. वाळूज-ब्रह्मगव्हाण या एमआयडीसीच्या रस्त्यावरुन वस्तीकडे येत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लांझीलगतच्या खामनदी पुलावर टायर फुटल्याने चालक प्रभाकर शरणागत याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॉलीसह टॅक्टर खामनदीच्या पुलावरुन जवळपास ३० फुट खाली कोसळले. मात्र पुलाच्या फटीमध्ये ट्रॉली अडकल्याने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरमधील मुजरांनी दोघा-तिघांना बाहेर फेकले. काही वेळातच टॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात कोसळल्याने चालकसह ट्रॅक्टरमधील उसतोड मजूर खाली पडून गंभीर जखमी झाले. नारायणपूरचे माजी सरपंच नासेर पटेल, वजीर पटेल, उपनिरीक्षक लक्षमण उंबरे, पोहेकॉ. पांडूरंग शेळके आदींनी जखमींना मदत केली. यानंतर १०८ रुग्णवाहिकेतुन गंभीर जखमी मजुरांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळतण जमा करणाऱ्या दाम्पत्याची मदतनदीपात्रालगत जळतणासाठी लाकडे गोळा करणाºया अंबादास अशोक सोनवणे व त्यांची पत्नी सुवर्णा यांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमींना या दाम्पत्याने दिलासा देत मदतीसाठी आरडा-ओरडा केला. यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक व लगतच्या शेतकºयांनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर सर्व जखमींना पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू