केटरर्सचालकाचा मजूर महिलेवर अत्याचार

By Admin | Updated: September 11, 2016 01:23 IST2016-09-11T01:10:48+5:302016-09-11T01:23:43+5:30

औरंगाबाद : केटरर्सचालकाने त्याच्याकडे काम करणाऱ्या मजूर महिलेचा गरिबीचा फायदा घेऊन तिच्या पतीला आणि मुलाचे बरे-वाईट करण्याची धमकी देऊन बलात्कार केला.

The torture of the Caterpillar laborer | केटरर्सचालकाचा मजूर महिलेवर अत्याचार

केटरर्सचालकाचा मजूर महिलेवर अत्याचार

औरंगाबाद : केटरर्सचालकाने त्याच्याकडे काम करणाऱ्या मजूर महिलेचा गरिबीचा फायदा घेऊन तिच्या पतीला आणि मुलाचे बरे-वाईट करण्याची धमकी देऊन बलात्कार केला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या घृणास्पद घटनेची पीडितेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
निरंजन धात्रक (रा. भारतनगर, गारखेडा परिसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा केटरर्सचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे पीडितेचा पती आणि ती कामाला जात असत. यामुळे आरोपीचे पीडितेच्या घरी अधूनमधून येणे-जाणे होते. दोन महिन्यांपूर्वी आरोपी हा कामावर बोलावण्याचा बहाणा करण्यासाठी पीडितेच्या भारतनगर येथील घरी गेला. यावेळी तिचा पती घरी नव्हता आणि मुलेही घराबाहेर होती. यावेळी आरोपीने पीडितेच्या गरिबीचा आणि असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास तुझ्या पतीला आणि मुलांचे बरे-वाईट करून टाकीन, अशी धमकीच त्याने दिली. या घटनेमुळे घाबरलेली पीडिता सलग दोन महिने गप्प राहिली. मात्र, आरोपीने केलेल्या अत्याचाराबद्दल तिला प्रचंड चीड आली होती. त्यास शिक्षा देण्याचे मनोमन निश्चित केले व शुक्रवारी थेट मुकुंदवाडी ठाणे गाठून तक्रार नोंदविली.पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यास शनिवारी सायंकाळी अटक केली.

Web Title: The torture of the Caterpillar laborer