शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

आज त्रिमूर्ती शाळा पाडणार

By admin | Published: June 19, 2016 11:34 PM

औरंगाबाद : जयविश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीचा भूखंड एका खाजगी शैक्षणिक संस्थेला ९९ वर्षांच्या करारावर देण्याचा पराक्रम या भागातील सोसायटीने केला.

औरंगाबाद : जयविश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीचा भूखंड एका खाजगी शैक्षणिक संस्थेला ९९ वर्षांच्या करारावर देण्याचा पराक्रम या भागातील सोसायटीने केला. मागील तीन दशकांपासून मनपाच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्या संस्थेला प्रशासनाने सील ठोकले. सोमवारी संपूर्ण शाळा पाडण्यात येणार आहे.जयविश्वभारती गृहनिर्माण संस्थेने सीटीएस क्र. १५६८९ मधील ५२५ चौरस मीटर जागा त्रिमूर्ती बालक मंदिर या शैक्षणिक संस्थेस दिली. १९८४ मध्ये ९९ वर्षांच्या लीजवर जागा देण्यात आली. दुसरीकडे सोसायटीने आपल्या लेआऊटमधील ही जागा महापालिकेला दिली. महापालिकेनेही जागा त्वरित ताब्यात घेण्याचे औदार्य दाखविले नाही. मागील तीन दशकांपासून अनधिकृतपणे शाळा चालविण्यात येत आहे. त्रिमूर्ती बालक मंदिरला औरंगाबाद खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने ११ वर्षांपूर्वी जागा मनपाची असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संस्थेला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, यावर भर दिला. जागा ताब्यात न घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध प्रशासन घेत आहे. फाईल दाबून ठेवणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाईही करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जयविश्वभारती कॉलनी येथील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा आपल्या सोसायटीतून बाहेर करावी ही प्रमुख मागणी रहिवाशांची आहे. न्यायालयाने यासंदर्भात मनपाला उचित निर्देश दिले आहेत. त्यानुसार मनपाने शाळेला सील ठोकले.