शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेरपर्यंत थकीत शुल्क द्या

By admin | Updated: March 26, 2016 23:51 IST

औरंगाबाद : ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे मागील चार वर्षांचे थकीत शुल्क ३१ मार्चपर्यंत विनाअनुदानित शाळांना द्यावे,

औरंगाबाद : ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे मागील चार वर्षांचे थकीत शुल्क ३१ मार्चपर्यंत विनाअनुदानित शाळांना द्यावे, अन्यथा राज्यातील एकही इंग्रजी माध्यमाची विनाअनुदानित शाळा २५ टक्के प्रवेशप्रक्रिया राबविणार नाही, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) दिला आहे.यासंदर्भात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना निवेदन सादर केले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने २५ टक्के प्रवेशाची थकीत रक्कम न दिल्यास मोफत प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मेस्टाने घेतला आहे. मागील वर्षी २५ टक्क्यांतर्गत मोफत प्रवेश दिल्याचा थकीत परतावा मिळावा म्हणून राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यानंतर आरटीईच्या मोफत प्रवेशावर बंदी घालण्याचे आंदोलन केल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संघटनेला २७ एप्रिल २०१५ रोजी मंत्रालयात चर्चेला बोलावले. त्या बैठकीत इयत्ता पहिलीच्या वर्गापासून मोफत प्रवेशाचा एंट्री पॉइंट निश्चित करण्यात आला. त्याच बैठकीत एका महिन्याच्या आत मागील चार वर्षांचा थकीत परतावा देण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर दोन वर्षांचा मोफत प्रवेशाचा परतावा इंग्रजी शाळांना देण्यात आला. उर्वरित मोफत प्रवेशाचा थकीत परतावा लवकरात लवकर अदा करावा, अन्यथा २५ टक्के मोफत प्रवेशावर इंग्रजी शाळांना बहिष्कार टाकण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. निवेदनावर ‘मेस्टा’चे अध्यक्ष संजय तायडे, मनीष हांडे, प्रल्हाद शिंदे, प्रवीण आव्हाळे, अमित भोसेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. जि.प.ची एक शाळा घेणार दत्तकमहाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या (मेस्टा) वतीने प्रत्येक जिल्ह्यातील एक जिल्हा परिषदेची शाळा दत्तक घेऊन त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रयत्न केला जाणार आहे.