शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

तीन वॉटर प्लांट सील

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

नांदेड : मिनरल वॉटरची नियमबाह्य पद्धतीने निर्मिती करणाऱ्या शहर परिसरातील तीन ‘वॉटर प्लांटला’ एफडीएच्या पथकाने सील ठोकले़

नांदेड : मिनरल वॉटरची नियमबाह्य पद्धतीने निर्मिती करणाऱ्या शहर परिसरातील तीन ‘वॉटर प्लांटला’ एफडीएच्या पथकाने सील ठोकले़ सिडको येथील एमआयडीसी भागातील वॉटर प्लांटमधील पाणी नमुन्यात सायनाईड आढळून आल्यानंतर एफडीएने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली़एफडीए अथवा बीआयएस यापैकी कोणताही परवाना नसताना बेधकडपणे सुरु असलेल्या तीन वॉटर प्लांटवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली़ वाघी रस्त्यावरील विनोद तिघोटे यांच्या सुमेध इंडस्ट्रीज या कारखान्यास फक्त २० लिटर जार पुरवण्याची परवानगी आहे़ परंतु येथून ‘अ‍ॅक्वा प्लस’ नावाने पाणी पाऊच निर्मिती सुरु होती़ तसेच अन्य परवानेही काढले नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले़ जुना मोंढा भागात ‘इंदर एजन्सी’ या नावाने नेहा लालवाणी यांच्याकडून विनापरवाना मिनरल वाटरनिर्मिती करण्यात येत होती़ ‘अंजली अ‍ॅक्वा’ नावाने सदरील ठिकाणी २० लिटरचे जार विकले जात होते़ शहरातील गाडीपुरा भागात अवैधरित्या सुरु असलेला मिनरल वॉटर प्लांट बंद करण्याबाबत एफडीएने दीड वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती़ येथील साधनसामग्री रातोरात हलवून शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीत हा कारखाना पुन्हा थाटण्यात आला़ केटरींग गोडाऊन परिसरात सुरु असलेल्या या कारखान्यावर ८ जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे व त्यांच्या पथकाने धाड टाकली़ येथे ‘कम फे्रश कुल वाटर’ या नावाने २० लिटरचे जार कुठल्याही परवान्याविना तयार करत असल्याचे निदर्शनास आले़ सदरील कारखाना बटुकदेव दुबे व प्रदीप कनैयालाल पुरोहित यांच्याकडून चालविण्यात येत असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले़ सिडको एमआयडीसी परिसरात बालाजी ठाकूर यांच्या ‘ओम दातार’ या कारखान्यातील पाणी नमुन्यात सायनाईड आढळले होते़ २४ मे रोजी एफडीएने हा कारखाना सील केला़ यापाठोपाठ अवैधरित्या सुरु असलेले तीन कारखाने सील केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत़ यापुढेही ही कारवाई सुरु राहील़ (प्रतिनिधी)उन्हाळ्यात बाटलीबंद पाण्याची मागणी वाढते़ नागरिकांची गरज ओळखून पाणी पाऊच व घरगुती वापरासाठी २० लिटरचे जार अनेक कंपन्या पुरवितात़ जिल्ह्यात मिनरल वॉटर निर्मिती करणारे एकूण १७ अधिकृत प्लांट आहेत़ पाण्यातून होणारी आर्थिक उलाढाल पाहता अनेक धनदांडग्यांनी या व्यवसायात पदार्पण केले़वॉटर प्लांट चालविण्यासाठी बीआयएस मानके, एफडीएचा परवाना, शॉप अ‍ॅक्ट, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींची परवानगी आवश्यक आहे़ सर्व नियम धाब्यावर बसवून नांदेडात सुमेध इंडस्ट्रीज, इंदर एजन्सी व कम फ्रेश कुल वाटर हे वॉटर प्लांट सुरु होते़ नियमाबाह्य पद्धतीने सुरु असलेल्या मिनरल वॉटर कारखान्यातून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही खबरदारी घेण्यात येत नव्हती़ सील केलेले अंजली अ‍ॅक्वा, अ‍ॅक्वा प्लस व कम फ्रेश कुल वाटर ही उत्पादने ग्राहकांनी वापरु नयेत, असे आवाहन अन्न व औषधी प्रशासनाने केले आहे़