कोंबिग आॅपरेशनमध्ये तिघे जेरबंद

By Admin | Updated: December 22, 2014 23:45 IST2014-12-22T23:45:42+5:302014-12-22T23:45:42+5:30

जालना : शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कोंबिग आॅपरेशन राबविण्यास सुरूवात केली आहे. मात्र आरोपी सतर्क झाल्याने सोमवारी ही मोहीम दिवसा राबविण्यात आली

Three horned knobs in the training process | कोंबिग आॅपरेशनमध्ये तिघे जेरबंद

कोंबिग आॅपरेशनमध्ये तिघे जेरबंद


जालना : शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कोंबिग आॅपरेशन राबविण्यास सुरूवात केली आहे. मात्र आरोपी सतर्क झाल्याने सोमवारी ही मोहीम दिवसा राबविण्यात आली. शिकलकरी मोहल्ला, गुरूगोविंदसिंगनगर भागात अप्पर पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सदर बाजार व कदीम जालना पोलिसांनी जोरदार कारवाई केली. यात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
कडाक्याच्या थंडीचा लाभ घेत धाडसी चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जालना पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. यात रात्रीच्या वेळी कोबिंग आॅपरेशन राबविण्यात येते आहे. अप्पर पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील व अनील विभूते यांनी कर्मचाऱ्यांसह मोहिम राबविली. यात सहायक निरीक्षक मनिष पाटील, उपनिरीक्षक परदेशी तसेच सदर बाजार ठाण्याचे १२ तर कदीमचे २ कर्मचारीसह जलद कृती दलाचे १० जवान यांनी ही मोहिम राबविली. यात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. गेडाम यांनी सांगितले, या आॅपरेशनमध्ये सात आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येत आहे. ही मोहिम नियमित राबविण्यात येत असून आज सरप्राईस कोबिंग आॅपरेशन राबविण्यात आले.

Web Title: Three horned knobs in the training process