शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तीन रेल्वे उड्डाणपुलांना मिळाली मंजुरी

By admin | Updated: July 13, 2017 00:33 IST

परभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून,

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून, परभणी व परतूरच्या दोन पुलांसाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या उड्डाणपुलांच्या कामाच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांत सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे़ परभणी ते जालना रेल्वे मार्गावर दिवसभरात जवळपास १६० रेल्वे गाड्यांची ये-जा असते़ रेल्वे आल्यानंतर उड्डाणपूल नसल्याने रेल्वेमार्गावरील प्रमुख रस्त्यांचे फाटक बंद करण्यात येते़ परिणामी दिवसभरात अनेक वेळा रेल्वे फाटक बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्यामुळे किमान वर्दळीच्या रस्त्यांवर तात्काळ उड्डाण पूल उभारावेत, अशी नागरिकांची मागणी होती; परंतु, ही मागणी मंजूर होत नव्हती़ वर्दळीच्या रस्त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याचा तसेच मानवत रोड येथील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रस्त्याचा आणि परतूर येथील रस्त्याचाही समावेश आहे़ या तिन्ही ठिकाणी प्राधान्याने रेल्वे उड्डाणपूल उभारावेत, यासाठी खा़ बंडू जाधव यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे भेट घेतली होती़ त्यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवत उड्डाणपुलांना मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन खा़ जाधव यांना दिले होते़त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या तिन्ही मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी दिली आहे़ त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरुन कृषी विद्यापीठात जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूर मंजूर करण्यात आली आहे़यामध्ये केंद्र शासन २४ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार ३९ कोटी रुपयांचा निधी देणार आहे़याशिवाय परतूर येथील रेल्वे पुलासाठी केंद्र सरकार १७ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार २७ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे़ अशा ४४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे़ येत्या महिनाभराच्या आत या दोन्ही रेल्वे पुलांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत़