भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षासह तीन आरोपी अखेर गजाआड

By Admin | Updated: November 6, 2014 01:19 IST2014-11-06T01:19:08+5:302014-11-06T01:19:08+5:30

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यावरच चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता.

Three accused along with BJYM's Junk | भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षासह तीन आरोपी अखेर गजाआड

भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षासह तीन आरोपी अखेर गजाआड


औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यावरच चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या गुन्ह्यात गेल्या महिनाभरापासून फरार असलेला भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष मनोज भारस्करसह तीन आरोपींना सिडको पोलिसांनी काल रात्री अटक केली.
आरोपींमध्ये मनोज परमेश्वर भारस्कर (रा. गजानन मंदिर परिसर), विशाल रामदास गायके (रा. पुंडलिकनगर) व याग्निक भूपेंद्र पटेल (रा. सिडको, एन-५) यांचा समावेश आहे. घटनेबाबत माहिती देताना फौजदार गोरख चव्हाण यांनी सांगितले की, १ आॅक्टोबर रोजी सिडकोत भाजपाची प्रचार रॅली सुरू होती. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते मयूर वंजारी यांच्या पायाचा धक्का लागल्याच्या कारणावरून मनोज भारस्करने वाद घातला. तेथे इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करून हे प्रकरण मिटविले.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोज भारस्कर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध सिटीचौक, सिडको, एमआयडीसी वाळूज, सातारा, क्रांतीचौक या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण दहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Three accused along with BJYM's Junk