अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?

ही जोडी डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत एकाच संघाकडून खेळताना दिसली होती.

By सुशांत जाधव | Updated: April 22, 2026 17:06 IST2026-04-22T16:53:46+5:302026-04-22T17:06:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Arjun Tendulkar vs Vaibhav Suryavanshi Net Worth IPL Salary Educational Qualifications of LSG and RR players | अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?

अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?

आयपीएलच्या सलग दुसऱ्या हंगामात वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोटक फलंदाजीसह सर्वांचे लक्षवेधून घेताना दिसत आहे. दुसरीकडे क्रिकेटचा देव आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा  मैदानात उतरला नसला तरी तो चर्चेत असल्याचे दिसते. MI च्या ताफ्यातून LSG च्या संघाच्या ताफ्यात सामील झाल्यावर पंतच्या नेतृत्वाखाली नव्या संघाकडून तो कधी पदार्पण करणार हा विषय चर्चेत आहे. आयपीएल आधी वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर ही जोडी डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत एकाच संघाकडून खेळताना दिसली होती. इथं जाणून घेऊयात RR चा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि LSG च्या ताफ्यातील अष्टपैलू खेळाडूंचे नेटवर्थ, आयपीएलमधील पगार आणि युवा खेळाडूंच्या शिक्षणासंदर्भातील खास स्टोरी 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अर्जुन तेंडुलकर नेटवर्थ अन् शिक्षण

अर्जुन तेंडुलकर हा डावुखुऱ्या हाताने फलंदाजीसह गोलंदाजी करतो. २६ वर्षीय ऑलराउंडरनं २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाचा सामना खेळला होता. सध्याच्या घडीला ३० लाखांसह तो लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाचा भाग आहे. देशांतर्गत सामन्यांचे नियमित मानधन, ब्रँडच्या जाहिराती आणि त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक पोर्टफोलिओशी जवळून निगडित असलेल्या गुंतवणुकीतून तो उत्तम कमाई करतो. सध्याच्या घडीला जवळपास २२ कोटींचा मालक आहे. 

ओल्ड इज गोल्ड! IPL मधील धमाकेदार कामगिरीसह ‘या’ ५ धुरंधरांनी ठोठावला Team India चा दरवाजा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईहून गोव्याला स्थलांतरित होत असतानाच अर्जुन तेंडुलकरने मुंबई विद्यापीठातून आपली पदवी मिळवली. त्याआधी त्याने प्रतिष्ठित धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

दहावीच्या बोर्डाची परीक्षा सोडून IPL ला पसंती; वैभव सूर्यवंशीचं नेटवर्थ किती?


वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या संघाने वैभव सूर्यवंशीसाठी १.१ कोटी एवढी रक्कम मोजली होती. २०२६ च्या हंगामात RR नं त्याला त्याच किंमतीसह रिटेन केले. अल्प वयात मोठी कामगिरी करून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांच्या रुपात मिळालेली धनराशी आणि IPL सह देशांतर्गत क्रिकेटमधील कमाईच्या जोरावर वैभव सूर्यवंशी हा वयाच्या १५ व्या वर्षी जवळपास २.५ कोटींचा मालक आहे.

वैभव सूर्यवंशी ताजपूरमधील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी आहे. अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दहावीच्या बोर्डाची परीक्षा सोडून त्याने आयपीएल २०२६ च्या तयारीवर भर दिला. यंदाच्या वर्षी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी त्याने फॉर्म भरला होता. पण परीक्षेला न बसता तो RR च्या ताफ्यात सामील झाला. 

एकंदरीत फिल्डबाहेरील कमाईच्या बाबतीत अर्जुन तेंडुलकर भारी असला तरी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीनं वयाच्या १५ व्या वर्षी मोठा चाहता वर्ग कमावला आहे. या चाहत्यांसह मैदानातील कामगिरीच्या जोरावर त्याचा आलेख वाढत जाईल, अशी अपेक्षा आहे. 

Web Title : अर्जुन तेंदुलकर और वैभव सूर्यवंशी: मैदान के बाहर की अनकही कहानी

Web Summary : अर्जुन तेंदुलकर, बिना खेले भी चर्चा में। वैभव सूर्यवंशी का शानदार प्रदर्शन। अर्जुन की कुल संपत्ति ₹22 करोड़; वैभव की ₹2.5 करोड़। वैभव ने परीक्षा से पहले आईपीएल को प्राथमिकता दी।

Web Title : Arjun Tendulkar and Vaibhav Suryavanshi: Untold Story Beyond the Field

Web Summary : Arjun Tendulkar, despite not playing, remains in discussion. Vaibhav Suryavanshi shines. Arjun's net worth is ₹22 crore; Vaibhav's is ₹2.5 crore. Vaibhav prioritized IPL over exams.