शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल धान्य उघड्यावर

By admin | Updated: June 6, 2014 01:07 IST

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही शेतकर्‍यांना अद्याप मालाचे पैसे मिळाले नाहीत़ शिवाय हा माल उघड्यावरच असल्याने पावसाने भिजण्याची शक्यता आहे़तालुक्यातील २८१ शेतकर्‍यांनी या केंद्रावर ३८०२ क्विंटल तुरीची विक्री केली होती़ यापैकी २७९० क्विंटल तुरीचे ४ हजार ३०० रुपये दराने १ कोटी १९ लाख ९७ हजार रुपये वाटप करण्यात आले़ मात्र १०१३ क्विंटलचे ४३ लाख ५१ हजार रुपये अद्यापही थकले आहेत़ माल विक्री करुनही पैसे पदरी पडले नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे़ हरभरा खरेदी केंद्रावर २२७ शेतकर्‍यांनी ११ हजार दोनशे क्विंटल हरभर्‍याची विक्री केली़ याचे अडीच कोटी रुपये अद्याप वितरीत झाले नाहीत़ व्यापार्‍यांपेक्षा शासनाकडून मालाला चांगली किंमत येत असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने तूर, सोयाबीन नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणले़ मात्र खरेदी-विक्री संघाच्या ढिसाळ नियोजनामुळे आलेल्या मालाचे मोजमाप मुदतीत केले नाही़ त्यामुळे माल खरेदी केला जातो की नाही? अशी शंका शेतकर्‍यांना आली़ त्यावर मार्केट कमिटीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर व संचालकांनी सर्व शेतकर्‍यांचा माल नोंदणीप्रमाणे खरेदी करावा अन्यथा उपोषणाचा पवित्रा घेतला़ त्यामुळे माल खरेदीसाठी वाढीव मुदत मिळाली़ शेतकर्‍यांचा हरभरा तोल करुन रिपोर्ट, वखार पावती मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यास विलंब होत आहे़ त्यामुळे हजारो क्विंटल माल रस्त्यावर पडून आहे़ दोन दिवसात मृग नक्षत्र सुरु होत आहे़ अशावेळी पाऊस झाल्यास रस्त्यावरील हजारो क्विंटल माल भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पेरण्या अवघ्या काही दिवसांवर आहेत़ माल विक्रीचे पैसे अद्याप हाती पडले नसल्याने बी-बियाणे, खत अन्य साहित्य विकत घ्यायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे़ नाफेडने खरेदी केलेल्या मालाचे पैसे तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मार्केट कमिटीवर गेलेल्या शेतकरी मंडळाने दिला आहे़ (वार्ताहर)२४ तासात पैसे द्याशेतकर्‍यांचा माल खरेदी केल्यानंतर चोविस तासाच्या आत पैसे वितरीत करण्याची सूचना शासनाने दिली होती़ परंतु दोन महिने लोटले तरी तुर, हरभर्‍याचे पैसे मिळत नाहीत़ यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़