शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यासाठी हजार पोलीस दिमतीला

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

बीड : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे़ जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या जोडीला एक हजार पोलिसांची

बीड : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे़ जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या जोडीला एक हजार पोलिसांची वाढीव कुमक घेतली आहे़ दहा ठाण्यांमध्ये जादा बंदोबस्त ठेवला जाणार आहे़पोळा सणादिवशी गावागावात बैलजोड्यांच्या मिरवणुका निघतात़ यावेळी मानापानावरुन तसेच बैल पुढे, मागे घेण्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असते़ पोळ्यादिवशी अनुचित प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत़ त्यामुळे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी उपाययोजना केल्या आहेत़ स्थानिक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील २५० पोलिस दिले जाणार आहेत़ यात ५० महिलांचाही समावेश आहे़ दंगलनियंत्रण पथकाच्या ६ तुकड्या तैनात राहणार आहेत़ शिवाय ५६० होमगार्डही बंदोबस्ताला राहतील़ ४६० पुरुष १०० महिला होमगार्डचा समावेश आहे़ सणाच्या अनुषंगाने राखीव पोलिसही सतर्क राहतील, असे जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक लक्ष्मण मंकावार यांनी सांगितले़गडबड केल्याय गय नाहीसण शांततेत साजरा व्हावा, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत़ पोळा सणात कोणी गडबड केली तर गय केली जाणार नाही, असा इशारा अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला आहे़ संवेदनशील गावांमध्ये जादा बंदोबस्त राहील़ दंगल नियंत्रण पथके या गावांवर करडी नजर ठेवतील, असे रेड्डी म्हणाले़ (प्रतिनिधी)पोळा सणात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहेत़ आजारी वगळता इतर सर्व रजा रद्द असून पोलिसांना सतर्क तेच्या सूचना आहेत़ पोळ्यापाठोपाठ गणेशोत्सव, दुर्गोत्सव व त्यानंतर दिवाळी हे सण आहेत़ त्यामुळे पोलिसांचे शेड्यूल ‘बिझी’ बनले आहे़येथे राहील जादा बंदोबस्तजिल्ह्यातील काही संवेदनशील ठिकाणी जादा बंदोबस्त देण्यात आला आहे़ नेकनूर, माजलगाव ग्रामीण, आष्टी, शिरुर, धारुर, अंबाजोगाई ग्रामीण, परळी ग्रामीण, सिरसाळा, केज या ठाण्यांना जादा कुमक उपलब्ध करुन दिली आहे़