शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घरफोड्यांचा तपास शुन्यच!

By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST

रमेश शिंदे , औसा मागील महिनाभरात औसा शहरात पाच ते सहा घरफोड्या भरदिवसा झाल्या़ तर एका कापड दुकानातून ग्राहक बनू आलेल्या महिलेने ५० हजार रूपये घेऊन पळ काढला़

रमेश शिंदे , औसामागील महिनाभरात औसा शहरात पाच ते सहा घरफोड्या भरदिवसा झाल्या़ तर एका कापड दुकानातून ग्राहक बनू आलेल्या महिलेने ५० हजार रूपये घेऊन पळ काढला़ तर दोन दिवसांमधून ठराविक दिवसाच्या अंतराने जवळपास सहा ते सात लाख रूपयांच्या दागिण्यांची चोरी झाली़ जून महिन्यात नागरसोगा येथे ७ लाखांच्या दागिण्यांची चोरी झाली़ परंतु, या चोऱ्यांचा तपास शुन्यातच असल्याने औसा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे़ औसा तालुक्यात मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही चोऱ्यांचे सत्र सुरु आहे़ शहरात तर मागील महिनाभरपासून भर दुपारीच घरफोडीची मालिकाच सुरु झाली आहे़ अनेकवेळा लहानसहान चोऱ्या होतात़ अशावेळी नको ती पोलिसांची झंजट म्हणून पोलिसाकडे तक्रार करण्याचे नागरिक टाळतात़ पण मोठी चोरी झाल्यानंतर मात्र पोलिसात गुन्हे नोंद होतात़ मागील महिनाभरात फक्त औसा शहरात पाच ते सहा घरफोड्या भर दुपारी झाल्या़ तर अन्य एका ठिकाणी भरदुपारीच एका दुकानदाराच्या गल्ल्यातील पैैसे पळविले़ यामध्ये दोन ते तीन गुन्हे नोंद आहेत़ यामधील दुकानामध्ये चोरी केलेल्या महिलेला पकडल्याचे पोलिस सांगतात़ पण साडेतीन ते चार लाखांची एक व पावणेतीन लाखांची एक अशा दोन घरफोड्यांचा तपास लावण्यात औसा पोलिसांना अजूनही यश मिळाले नाही़ जून महिन्यात नागरसोगा येथे मोहन मुसाडे यांचे घर फोडून चोरट्यांनी सात लाखांचे दागिणे व ३० हजार रूपये रोख लंपास केल्याची घटना घडली़ पंधरा दिवसापूर्वी गौरीशंकर मिटकरी, तर आठ दिवसापूर्वी अनिल मुळे यांचे घर भरदुपारी फोडून आठ लाखांचा ऐवज लांबविण्यात आला़ काहीवेळा नागरिक पोलिसांची नुसती झंझट नको म्हणून तक्रारी देणे टाळतात़ ज्यांनी तक्रारी दिल्या त्यांचा तक्रारींचा तपास लागत नसल्याने औसा तालुक्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़