चोरलेल्या २१० टीव्हींचा साठा जप्त

By Admin | Updated: March 1, 2015 00:09 IST2015-03-01T00:02:07+5:302015-03-01T00:09:19+5:30

औरंगाबाद : शहरातील जुना मोंढा भागातून ४०० टीव्ही आणि स्पेअर पार्टसह चोरीला गेलेल्या ट्रकचा आणि चोरट्यांचा शोध घेण्यात क्रांतीचौक पोलिसांना यश आले आहे.

Thieves of the stolen 210 tie were seized | चोरलेल्या २१० टीव्हींचा साठा जप्त

चोरलेल्या २१० टीव्हींचा साठा जप्त


औरंगाबाद : शहरातील जुना मोंढा भागातून ४०० टीव्ही आणि स्पेअर पार्टसह चोरीला गेलेल्या ट्रकचा आणि चोरट्यांचा शोध घेण्यात क्रांतीचौक पोलिसांना यश आले आहे. चोरलेल्या टीव्हींपैकी २१० टीव्ही हैदराबाद (आंध्र प्रदेश) आणि गुलबर्गा (कर्नाटक) येथून जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद अब्दुल अली खान सत्तार खान (२८, रा. हैदराबाद), सैफ वसीम अब्दुल अक्रम (२८), शेख हुमायू शेख सुलेमान (४९), मोहम्मद इद्रीस मोहम्मद शहाजहाँ (३२), शेख नजमोद्दीन शेख इसोमोद्दीन (३३, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शेख आमेर शेख इसाक (२२) आणि शेख अब्दुल रहिम अब्दुल करीम ऊर्फ हसन पाशा (रा. हैदराबाद), असे हैदराबादेतून पकडून आणलेल्या आरोपींची नावे आहेत.
क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, बायजीपुरा येथील रहिवासी सय्यद फवाज सय्यद अब्दुल गफ्फार यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच-२० एटी ६६१६ हा आहे. २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांनी सागर ट्रान्सपोर्टमार्फत व्हिडिओकॉन कंपनीच्या ४०० टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग सुरत येथे घेऊन जाण्याचे भाडे मिळाले होते. त्यानंतर त्यांनी हा ट्रक जुना मोंढा रोडवर उभा केला आणि ते मुक्कामासाठी घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा ट्रक चोरीला गेल्याचे समजले. याप्रकरणी शेख इनायत शेख हबीब (२०, रा. बायजीपुरा) या ट्रकचालकास पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडले होते.
हैदराबादेतील कंपनीच्या एका डीलर्सला चोरटे अर्ध्या किमतीत टीव्ही विक्री करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी आम्ही कंपनीचे डीलर असल्याचे सांगितले होते. एवढ्या कमी किमतीत थेट कंपनी आपल्यालाच का माल पुरवीत नाही, अशी विचारणा त्या डीलरने कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. तेव्हा त्यांनी टीव्हीच्या बॅचविषयी माहिती विचारली तेव्हा त्यांना सदर टीव्ही चोरीचे असल्याचे आणि याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल असल्याचे कळविले. त्यानंतर त्यांनी चोरीचे टीव्ही विक्री करण्यासाठी येणाऱ्यास थांबवून ठेवण्याचे सांगितले. ही बाब क्रांतीचौक पोलिसांना कळविण्यात आली. क्रांतीचौक पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने चोरट्यांना पकडले. त्यांनी विविध ठिकाणी विक्री केलेले २१० टीव्ही जप्त केले.
त्यानंतर पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सय्यद सिद्दीकी, कर्मचारी हेमंत सुपेकर, सतीश आहेरकर, समद पठाण, मुनीर पठाण, संदीप जमधडे आणि नारायण पायघन यांनी हैदराबाद आणि गुलबर्गा येथे जाऊन आरोपींना पकडून आणले.

Web Title: Thieves of the stolen 210 tie were seized