उधारी मागितल्याने घरात कोंडले

By Admin | Updated: May 19, 2014 01:08 IST2014-05-19T00:47:28+5:302014-05-19T01:08:31+5:30

जालना : तालुक्यातील वखारी येथे ‘मोटार रिवांडिंग’ केलेल्या कामाची उधारी मागितल्याने श्रीराम गुलाव घुले व त्यांच्या कुटूंबियांना गावातील एका गटाने घरात कोंडून ठेवले.

They demanded the bribe money in the house | उधारी मागितल्याने घरात कोंडले

उधारी मागितल्याने घरात कोंडले

 जालना : तालुक्यातील वखारी येथे ‘मोटार रिवांडिंग’ केलेल्या कामाची उधारी मागितल्याने श्रीराम गुलाव घुले व त्यांच्या कुटूंबियांना गावातील एका गटाने घरात कोंडून ठेवले. बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १८ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. श्रीराम घुले यांनी वीज पंप दुरूस्तीचे पैसे मागितले होते. त्यामुळे प्रभाकर गुलाव घुले, विनायक नारायण घुले, गणेश विनायक घुले, दिनकर गुलाब घुले, मंजाराम गुलाब घुले, निवृत्ती रंगनाथ घुले, ज्ञानदेव रंगनाथ घुले आदींनी काठ्या, सळई व दगडाने हल्ला करून श्रीराम घुले यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही कोडून ठेवले. या प्रकारानंतर श्रीराम घुले यांनी तालुका जालना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक चौधरी करीत असल्याचे जमादार दुसाने व कमलाकर अंभोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: They demanded the bribe money in the house