शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अंधार होणार दूर

By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST

परभणी : महानगरपालिकेला पथदिवे बसविण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याअंतर्गत ५ हजार पथदिवे शहरात बसविले जाणार आहेत.

परभणी : महानगरपालिकेला पथदिवे बसविण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याअंतर्गत ५ हजार पथदिवे शहरात बसविले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील रस्त्यांवरील अंधार दूर होणार आहे.शहरात विविध रस्त्यांवर तसेच वसाहतीमधील रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने दिवे बसविले जातात. वाहतुकीला त्रास होणार नाही. तसेच परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य राहणार नाही, या उद्देशाने शहरामध्ये ठिकठिकाणी पथदिवे बसविले आहेत. मागील काही वर्षांपासून पथदिवे बसविण्यात आले खरे. परंतु, त्यातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत आहेत. मुख्य रस्त्यावरील अनेक चौकांमधील पथदिवे नियमितपणे सुरु असतात. परंतु, वसाहतींमधील पथदिव्यांचा प्रश्न मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. पथदिवे नसल्याने वसाहतींमध्ये अंधार पसरलेला असतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच या अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. वेळोवेळी मागणी करुनही वसाहतींमध्ये पथदिवे बसविले जात नव्हते. प्रत्यक्षात पथदिव्यांचे साहित्य मनपाकडे उपलब्ध नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. पथदिव्यांच्या प्रश्नावर मनपाने पाठपुरावा केला असून हा प्रश्न आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. मुलभूत सुख-सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान योजनेतून ५ कोटी रुपये मनपाला मंजूर झाले आहेत. या पाच कोटी रुपयांमधून एलईडी स्ट्रीट लाईट आणि मुख्य चौकात हायमास्ट दिवे बसविले जाणार आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागातही एलईडी दिवे बसविले जातील. सुमारे पाच हजार दिवे बसविण्यात येणार असून २० चौकांमध्ये हायमास्ट दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंधार दूर होणार आहे. (प्रतिनिधी)