शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

सोन्नेवाडीत काविळीचे सोळा रूग्ण आढळले

By admin | Updated: September 2, 2014 01:51 IST

ईट : भूम तालुक्यातील सोन्नेवाडी गावामध्ये दहा दिवसांपासून पडत असलेल्या पाण्यामुळे एका जलस्त्रोताचे पाणी दुषित होऊन गावात काविळीची साथ पसरली आहे.

ईट : भूम तालुक्यातील सोन्नेवाडी गावामध्ये दहा दिवसांपासून पडत असलेल्या पाण्यामुळे एका जलस्त्रोताचे पाणी दुषित होऊन गावात काविळीची साथ पसरली आहे. सोमवारी येथे या आजाराचे १६ रुग्ण आढळले आहेत. वैद्यकीय विभागाचे पथक याठिकाणी सहा दिवसांपासून तळ ठोकून असून, ही साथ आटोक्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र भराटे यांनी सांगितले.मागील १० ते १५ दिवसांपासून परिसरात दमदार पाऊस होत असल्याने भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्यामध्ये नियमितपणे टीसीएल पावडरचा वापर करण्यात येत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य आहे. परंतु, एका बोअरचे पाणी अशुध्द झाले असून, ते पाणी पिण्यासाठी वापरलेल्या ग्रामस्थांना कावीळ साथरोगाची लागण झाली आहे. २७ आॅगस्ट रोजी पहिल्यांदा अशा लक्षणाचा रूग्ण आढळून येताच सरपंच सतीश सोन्ने यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांच्याशी संपर्क साधली. यानंतर डॉ. पोत्रे यांच्यासह एक पथक याठिकाणी पाठविण्यात आले आहे.दरम्यान, अशी लक्षणे असलेली जवळपास १६ रुग्ण या गावात आढळून आल्याने १७ आॅगस्टपासून आजपर्यंत ईट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रवींद्र भराटे यांच्यासह एक पथक येथे ग्रा.पं. कार्यालयामध्ये तळ ठोकून आहे. यामध्ये आरोग्य सेविका आर. जी. राठोड, एस.व्ही. पवार व एस.एन.मिसाळ यांचा समावेश आहे. याठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करुन दररोज रुग्णांची तपासणी केली जाते. सर्व मिळून ३० ते ४० रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार केला जातो. तसेच सध्या ही साथ आटोक्यात आल्याची माहिती डॉ. रवींद्र भराटे यांनी यावेळी दिली. गावातील इतर सर्व जलस्त्रोताचे निर्जंतुकीकरणाचे कामही आरोग्य सेवक व ग्रा.पं. च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)