शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

्रफासेपारधी, मुले पळविणारी टोळी नाही

By admin | Updated: August 9, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : ढोकीसह कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात फासे पारधी आल्याची तर काही भागात लहान मुलांना पळविणाऱ्या टोळ्या सक्रीय

उस्मानाबाद : ढोकीसह कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात फासे पारधी आल्याची तर काही भागात लहान मुलांना पळविणाऱ्या टोळ्या सक्रीय असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर पसरविल्या जात आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी केले आहे़ मागील चार दिवसांत सोशल मिडियामध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात तीन हजार फासे पारधी उतरल्याची अफवा पसरविली जात आहे. सदर टोळीकडून दरोडे टाकून माल लुटला जात आहे. तसेच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचा मॅसेज मोबाईलवरुन फिरत आहे. मोबाईलवरील या बातमीसोबत काही फोटोही अपलोड केले जात आहेत. या प्रकारामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. सद्यस्थितीत पावसाअभावी जिल्हा तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. त्यात अशा अफवा पसरल्याने सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्रिमुखे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी) शिराढोण परिसरात नागरिकांनी काढली रात्र जागूनमोबाईलवरुन चुकीच्या अफवा पसरविल्या गेल्याने पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सोसावा लागतो. याचा प्रत्यय शनिवारी शिराढोण परिसरात आला. येथील सहा गावांत वरील प्रकारची अफवा पसरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. नायगाव, पाडोळी, बोरगाव (खु), पिंपरी, रायगव्हाण व जायफळ या गावांत हा प्रकार घडला. पोलिसांसह नागरिकांनीही रात्रभर गस्त घातली. मात्र एकही संशयित व्यक्ती न आढळल्याने ही अफवा असल्याचे उघड झाले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोबाईलवर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे शिराढोणच सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी कळविले आहे़