शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिकेतच आता उपचाराची सुविधा

By admin | Updated: May 19, 2014 00:15 IST

हिंगोली : एका दवाखान्यातून दुसर्‍या दवाखान्यात रूग्णांना रेफर करण्यासाठी आत्तापर्यंत वापरल्या जाणार्‍या रूग्णवाहिकेतच आता रूग्णांवर उपचार केले जाणार असून

हिंगोली : एका दवाखान्यातून दुसर्‍या दवाखान्यात रूग्णांना रेफर करण्यासाठी आत्तापर्यंत वापरल्या जाणार्‍या रूग्णवाहिकेतच आता रूग्णांवर उपचार केले जाणार असून, तशा अत्याधुनिक आयसीयूसारखी व्यवस्था असलेल्या १० रूग्णवाहिका जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. अतिजोखिमेच्या रूग्णास दवाखान्यात पोहचेपर्यंत प्राण गमवावे लागतात. अनुचित घटनेनंतर रूग्णास तात्काळ उपचाराची आवश्यकता भासते. थोडाही उशिर रूग्णांच्या जीवावर बेतू शकतो. म्हणून घटनास्थळावरच रूग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत छोटखानी आयसीयू दवाखान्यासारखी व्यवस्था असलेल्या ९३७ अत्याधुनिक रूग्णवाहिका राज्यतील प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. सामान्य रूग्णवाहिकेचे काम एका दवाखान्यातून दुसर्‍या दवाखान्यात रुग्णाला पोहोचते करण्याचे असते. त्यात रूग्णांना कसल्याही प्रकारचा उपचार मिळत नाही; परंतु आताच्या नव्या रूग्णवाहिकेत घटनास्थळावरच रूग्णांना उपचार उपलब्ध दिले जात आहेत. म्हणून निव्वळ रेफरसाठी ही रूग्णावाहिका उपयोगात आणता येत नाही. आरोग्य विभागाची तशी सक्ती असल्याने डॉक्टरांना मर्यादा पडतात. शिवाय सामान्य रूग्णालयाशी समन्वय ठेवून जबाबदारीने काम करण्याच्या सुचना आरोग्य विभागाने रूग्णवाहिकेतील डॉक्टरांना दिल्या आहेत. अत्याधुनिक सुविधांमुळे कोणत्याही प्रकारच्या रूग्णांना ही रूग्णावाहिका कामी पडणारी असल्याचे डॉ. फरीन उस्मानी यांनी सांगितले; पण ३० किलो मीटरपेक्षा अधिक अंतरावरील रूग्णांना या रूग्णवाहिकेचा फायदा होणार नाही. सामान्य रूग्णालयापासून ३० कि.मीच्या अंतरावरील रूग्णांसाठी टोल फ्री १०८ क्रमांकावरून रूग्णवाहिकेशी संपर्क साधता येईल. पहिला फोन पुणे येथील मुख्य कार्यालयात लागल्यानंतर तेथून रूग्णवाहिकेच्या पथकातील डॉक्टरांना संपर्क साधल्या जाईल. रूग्णांचे नाव, ठिकाण, आजाराबाबत माहिती देवून अतिजोखीमेच्या ठिकाणी रूग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान रूग्णांना उपचारासह दवाखान्यात दाखल करण्यात येणार आहे. ४० लाखांची रूग्णवाहिका झाडाखाली सामान्य रूग्णालयात नसलेली आयसीयूची व्यवस्था या रूग्णवाहिकेत आहे. एका रूग्णवाहिकेची किंमत ४० लाखांच्या घरात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा दोन तर जिल्ह्यात एकूण १० रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यापैकी हिंगोली जिल्हा रुग्णालयातील दोन्ही रूग्णवाहिकेसाठी सामान्य रूग्णालयाकडून रेस्टींग रूम देण्यात येणार होते; परंतु रूग्णवाहिका दाखल होवून आठवडा होत असताना रेस्टींग रूमची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी रूग्णालयाच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाली या रूग्णवाहिका उभ्या कराव्या लागतात. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रूग्णवाहिकेत पावसाचे पाणी जावून साहित्य खराब होण्याची शक्यता आहे. तसेच सुरक्षा नसताना बाजुला असलेल्या रूग्णवाहिका संभाळण्याची तारेवरची कसरत आहे. लवकर रेस्टींग रूम न मिळाल्यास या रूग्णवाहिका खराब होण्यास वेळ लागणार नाही. रूग्णवाहिकेतील डॉक्टरांची टीम २४ तास सेवा देणारी रूग्णवाहिका असल्याने ५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही शिफ्टमध्ये २ पायलट (चालक), ३ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. एएलसी रूग्णवाहिकेसाठी डॉ. फरीन उस्मानी, डॉ. इनायत खान, डॉ. शिवाजी बेंडके आणि रामसिंग ठाकूर, राजेश सुवर्णकार पायलट आहेत. रूग्णवाहिकेची वैशिष्टे सामान्य रूग्णालयात दाखल झालेली एक रूग्णवाहिका अ‍ॅडव्हॉन्स लाईफ सर्व्हिस (एएलस) आणि दुसर्‍यात बेसीक लाईफ सपोर्ट (बीएलएस) सिस्टीम आहे. एएलसमध्ये महिलांच्या प्रसूतीपासून ते ह्रदयविकरापर्यंतच्या रूग्णांना उपचार देण्याची व्यवस्था आहे. प्रसूती कीट, कृत्रिम आॅक्सीजन, ईसीजी काढणे, रक्तदाब तपासणे, स्लाईन ड्रॉप, ३ स्ट्रेचर, श्वासाचा रस्ता सुरूळीत करणारे यंत्र, फ्रीज, एसी, पेपर नॉपकीन, रूग्णांसाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या नळ्या, वॉशबेसीन, रूग्णांना शॉक देण्याची व्यवस्था, अतिजोखीमेच्या रूग्णांना उपाचार देण्याचे साहित्य देखील उपलब्ध आहे. आयसीयूत मिळणार्‍या सर्व सुविधा या रूग्णावाहिकेत आहेत.