शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या जनतेने चारसौ पारवाल्यांना जमिनीवर आणले; आघाडीच सत्तेत येणार: सचिन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:17 IST

डबल इंजिन सरकार फक़्त धूर फेकणारे असल्याची टीकाही सचिन पायलट यांनी केली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. येथील जनतेने चारसौ पारवाल्यांचा स्वप्नभंग करुन त्यांना जमिनीवर आणले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सोमवारी मुकुंदवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला.

फुलंब्री मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विलासबापू औताडे व औरंगाबाद पूर्वचे उमेदवार लहू शेवाळे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. पायलट यांनी, बटेंगे तो कटेंगे हा नारा योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीला शोभा देत नसल्याचे सांगत ‘पढोंगे तो बढोंगे’ हे आमचे त्यांना प्रत्युत्तर असे बजावले.

महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत कसे आले हे देशाला माहिती आहे. सत्ताधारी पक्ष जाती-धर्माचा वापर करून राजकारण करत आहे. मात्र त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्या, युवक, महिलांच्या समस्यांकडे लक्ष नाही. आश्वासने दिली जातात. मात्र, ती पाळली जात नाहीत. संविधानात सर्वांना समान अधिकार आहेत, मात्र त्यालाच विरोध होत आहे. भाजप त्यांच्या विरोधकांना ईडी, पोलिस यांच्या माध्यमातून बदनाम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, विलास औताडे, लहू शेवाळे, सूर्यकांता गाडे, दिनकर ओंकार, मोहनराव देशमुख आदींची भाषणे झाली.

खोके सरकार -थोरातमहायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. खोक्याचा वापर करून ते सत्तेत आले. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. मात्र त्यांना सत्ता लाडकी आहे. त्यामुळे काँग्रेसला अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या विलास औताडे यांना निवडून आणा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वphulambri-acफुलंब्री