शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST

नांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने थाळीनाद मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ थकित मानधन त्वरित द्यावे, मानधनवाढ समितीने मानधनवाढीसंबंधी शिफारशी शासनाकडे सादर केल्या आहेत़ त्या मंजूर करून मानधनात वाढ करावी, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना खाण्यायोग्य आहार देण्यात यावा, लाभार्थींच्या आहारात वाढ करावी, जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे़ मात्र त्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती लाभाची रक्कम मिळाली नाही, ती रक्कम तातडीने द्यावी, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक द्यावा, रिक्त जागेवर सेविका, मदतनीसची नेमणूक करावी, सहा महिन्यानंतरही २०१७ चे परिवर्तन निधीचे पैसे अंगणवाडी केंद्राला दिले नाहीत, त्यामुळे अंगणवाडीसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ या कर्मचाऱ्यांचे परिवर्तन निधीचे पैसे द्यावे इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या़ दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हातात थाळी घेत जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली़ मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, शततारका काटफाडे, अश्विनी महल्ले, वंदना पवार, सुमित्रा जाधव, अनूसया नवसागरे, लाभसेटवार, कविता जाधव, सत्वशीला पंडित, कमल भगत, शकुंतला कोसलगे, कंधारकर यांनी केले़