जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपारीच्या उंबरठ्यावर

By Admin | Updated: August 7, 2015 01:15 IST2015-08-07T00:54:33+5:302015-08-07T01:15:50+5:30

बीड : वारंवार गुन्हे करुन समाजासाठी उपद्रवी ठरणाऱ्या गँगस्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपार करण्याचा

Ten gangsters in the district on the threshing floor | जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपारीच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपारीच्या उंबरठ्यावर


बीड : वारंवार गुन्हे करुन समाजासाठी उपद्रवी ठरणाऱ्या गँगस्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
महिन्याभरावर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तडीपार केले जाते ही कारवाई उपविभागीय अधिकारी घेत असतात. यंदाही याबाबतचा निर्णय होईल मात्र जे गुंडे वारंवार एकत्र येऊन गुन्हेगारीस चालना देत आहेत त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होणार असल्याचे अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात दंगे व वातावरण खराब करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेणे जिल्हास्तरावर सुरु आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातील हा एक भाग आहे. दहा गँगस्टरची माहिती उपलब्ध झाली असून त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव तयार केल्यानंतर तात्काळ यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दहा गँगस्टरवर कारवाई झाल्यानंतर इतर गुन्हेगारांनही याचा झटका बसणार यात शंका नाही. दोन गटात वाद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. या अुनषंगाने एका गँगमधील व्यक्ती व त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी याची माहिती घेऊनच कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. उपद्रवीमुल्य असणाऱ्या लोकांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम होत असते. त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई उचित राहिल यात शंकाच नाही.
दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्याकडूनही तडीपारीच्या कारवायावर लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ten gangsters in the district on the threshing floor