शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये बसून शिक्षक घेतात पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:52 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत ९१ शिक्षकांना वर्षभरापासून बसून पगार दिला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत ९१ शिक्षकांना वर्षभरापासून बसून पगार दिला जातो. आजही जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांना शिक्षक नाहीत. शिक्षकांच्या मागणीसाठी अनेक शाळांना ग्रामस्थांकडून कुलूप लावले जाते. त्यामुळे या शिक्षकांना बसून पगार देण्याऐवजी त्यांना तोंडी आदेशाद्वारे जेथे गरज आहे, अशा शाळांवर त्यांना तात्पुरती नेमणूक देण्याचे आदेश जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.या प्रश्नाकडे अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश बोरनारे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे या सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तेव्हा शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, २०१३-१४ पासून शाळांच्या संच मान्यता आॅनलाइन झाल्या. त्यानंतर २०१५-१६ मध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वर्गवारी नव्याने निश्चित करण्यात आली. पूर्वी माध्यमिक शाळेला जोडलेला आठवीचा वर्ग हा वर्गवारी निश्चितीमध्ये उच्च प्राथमिक शाळेला जोडला. त्यामुळे माध्यमिक शाळेमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत ९१ शिक्षक हे प्राथमिक शिक्षक म्हणून आता अतिरिक्त ठरले. या शिक्षकांना नियमानुसार रिक्त पदांवर सामावून घ्यावे लागेल.यावेळी मधुकर वालतुरे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना गणित व इंग्रजी शिकविणारे शिक्षक नाहीत. त्यामुळे या शिक्षकांना प्राथमिक शाळांमध्ये सामावून घेतल्यास गणित व इंग्रजी विषय शिकविण्याचा प्रश्न निकाली निघू शकेल. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी शिक्षणाधिकारी वाणी यांना सूचना केली की, यासंबंधी विभागीय उपायुक्त पारस बोथरा यांच्याशी चर्चा करा. त्यांचा सल्ला घ्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढा. तेव्हा उपस्थित सदस्यांनी आग्रह धरला की, सध्या प्राथमिक शाळांना शिक्षकांची गरज आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची अडचण येत असेल, तर त्यांना तोंडी आदेश देऊन शाळांवर नियुक्ती द्यावी.