विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन

By Admin | Updated: July 6, 2014 00:26 IST2014-07-05T23:53:22+5:302014-07-06T00:26:00+5:30

लातूर : विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने शनिवारी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले़

Teacher movement for various demands | विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन

लातूर : विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने शनिवारी लक्षवेधी धरणे करुन तर महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले़
आ़ विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चास शहरातील टाऊन हॉल येथून प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे व अतिरिक्त तुकड्यांवरील शिक्षकांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, मासिक वेतन एक तारखेस करण्यात यावे, जिल्हा परिषदेला आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या़ मोर्चात शिवाजी परगे, मोहन हाके, मदन धुमाळ, कालिदास माने, केशव गंभीरे, सुरेश शिंदे, महादेव सोनवणे, अशोक पवार आदी सहभागी झाले होते़
राज्यातील विद्यालयातून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतून काढण्यात यावे, या मागणीसाठी याच दिवशी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी पी़ एस़ घाडगे, व्ही़ जी़ पवार, विश्वंभर भोसले, गोविंद निटुरे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते़ तसेच २० पटांच्या शाळा बंद करु नये यासह अन्य मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी किशनराव बिरादार, सुनील हाके, बालाजी येळीकर, मुजावर नजीर आदी उपस्थित होते़

Web Title: Teacher movement for various demands