शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

योजना राबविलेल्या गावांतही टॅँकर

By admin | Updated: May 25, 2014 01:09 IST

विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असले तरी आता तेथे टॅँकर सुरू झाले आहेत.

 विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असले तरी आता तेथे टॅँकर सुरू झाले आहेत. या गावांच्या परिसरात पाणी उपलब्ध असतानाही टँकर सुरू कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाटोदा तालुक्यातील आनपटवाडी, नफरवाडी, सावरगाव, गितेवाडी, मंझरी घाट, वैजाळा, बेनसूर, सावरगाव, गांधनवाडी अशा नऊ गावांमध्ये सध्या टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या गावांना भायाळा आणि मंगेवाडी या प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. शासन नियमानुसार २ कि. मी. च्या आत पाणी उपलब्ध असल्यास टॅँकर सुरू करू नये. असे असतानाही टँकर सुरू करण्यात आले आहेत. शिवाय १४ गावांमध्ये विहीर, कूपनलिका अधिगृहित केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नफरवाडी येथे २००५-०६ मध्ये नळयोजना केलेली आहे. येथील पाणी कमी झाल्याचे कारण देत येथे टॅँकर सुरू केले आहे. वास्तविक या गावच्या परिसरात बागायती जमीन आहे. सावरगाव येथेही १ कोटी ३ लाख रुपये खर्च करून योजना राबविण्यात आली. काम अपूर्ण असल्याने येथे आता पुन्हा खर्च करण्यात येणार आहे. मंजरी घाट येथेही पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे. येथे विहीर खोदण्यात आली होती. या विहिरीतून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगत येथेही टॅँकर सुरू करण्यात आले. वास्तविक हे गाव मांजरा नदीकाठी असून भोवताली बागायती जमीन आहे. घुमरा पारगाव येथे तीन ते चारवेळेस पाणीपुरवठा योजनेवर खर्च करण्यात आलेला आहे. येथेही आता टॅँकर सुरू करण्यात आले आहे. आनपटवाडीसह वाडी-वस्त्यांवरही टॅँकर सुरू करण्यात आले आहे. सावरगाव येथील नळयोजना अद्यापही अपूर्ण आहे, तर गितेवाडी, गांधनवाडी या गावाजवळ पाणी उपलब्ध असतानाही तेथे टॅँकर सुरू करण्यात आले आहे. यावर्षी पाणीपातळी समाधानकारक असली तरी अनेक ठिकाणी टॅँकर सुरू करण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदभात ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता चव्हाण म्हणाले, वरिष्ठांच्या आदेशाने टॅँकर सुरू केले आहेत. (वार्ताहर)