४०० वाहनांवर कारवाईचा बडगा

By Admin | Updated: August 20, 2014 01:52 IST2014-08-20T01:06:50+5:302014-08-20T01:52:22+5:30

लातूर : जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सूचनेवरून लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात अचानकपणे वाहन तपासणी मोहिम हाती घेतली़

Take action against 400 vehicles | ४०० वाहनांवर कारवाईचा बडगा

४०० वाहनांवर कारवाईचा बडगा




लातूर : जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सूचनेवरून लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात अचानकपणे वाहन तपासणी मोहिम हाती घेतली़ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू केली आहे़ दोन दिवसांत वाहन तपासणीत ४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ५० हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़
लातूर शहरातील गांधी चौक, गुळ मार्केट, राजीव गांधी चौक, नांदेड रोड आदी ठिकाणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन तपासणी मोहिम सुरू केली़ या मोहिमेत कागदपत्र, वाहन परवाना, टिबल सीट, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यात वाहन परवाना नसलेल्या ६०, कागदपत्र नसलेले ७१, दुचाकीवर टिबल सीट वाहतूक १३, अवैध प्रवासी वाहतूक ७, एकेरी मार्गाचे उल्लंघटन, धरधाव निघालेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ७ हजार, परवान नसणाऱ्या ६० जणांकडून ६ हजार, कागदपत्र नसलेल्या ७१ जणांकडून ७ हजार १०० रूपये, भरधाव वेगाने निघलेल्या अशा १६१ वाहनधारकांकडून २२ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत २३१ वाहनांवर कारवाई करून २८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे़ रहदारीस अडथळा निर्माण करणारे आॅटो, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, वाहन परवाना आदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ दोन दिवसांपासून कागदपत्र तपासणी मोहिम सुरू करण्यात आली असून विद्यार्थी, आॅटोचालकांनी कागदपत्रे सोबत बाळगावीत असे आवाहन पोलिसांनी केले़(प्रतिनिधी)

Web Title: Take action against 400 vehicles