शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाराती’ला मिळाले गुरू !

By admin | Updated: July 9, 2015 00:22 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षकांची अनेक पदे रिक्त होते. या महिन्यात लोकेसवा आयोगामार्फत सहा

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईयेथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षकांची अनेक पदे रिक्त होते. या महिन्यात लोकेसवा आयोगामार्फत सहा तर पदोन्नतीवर १७ अशा एकूण २३ वैद्यकीय शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याने रुग्णसेवेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या सात वर्षांपासून एकलव्याप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षकांची ३६ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त होती. प्रशासकीय पातळीवर लाल फितीच्या कारभारामुळे या नियुक्त्या रखडल्याने याचा मोठा फटका वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी व रुग्णसेवेला सहन करावा लागत होता. मात्र या महिन्यात प्रशासनाच्या वतीने २३ रिक्त पदांवर डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या सर्व वैद्यकीय शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्यामुळे एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा फायदा झाला आहे. गेली अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना एकलव्याप्रमाणे शिक्षण घेण्याची वेळ आली होती. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक जागा वैद्यकीय शिक्षकांअभावी कमी होऊ लागल्या होत्या. याचा परिणाम रुग्णसेवेसह प्रशासनावरही होत होता. मात्र वर्षानुवर्षे रखडलेल्या २३ डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्याने या वैद्यकीय महाविद्यालयास व रुग्णालयास चांगले दिवस आले आहेत.