शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या कार्यक्रमाने सुजविले डोळे

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

औरंगाबाद : भाजपने रविवारी झाल्टा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील हॅलोजन बल्बमधील गॅस लिक होऊन हवेत संसर्ग निर्माण झाल्यामुळे नेत्यांसह

औरंगाबाद : भाजपने रविवारी झाल्टा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील हॅलोजन बल्बमधील गॅस लिक होऊन हवेत संसर्ग निर्माण झाल्यामुळे नेत्यांसह अनेक ग्रामस्थांच्या डोळ्याला संसर्ग झाला. रविवारी रात्री भाजपतर्फे जलयुक्त शिवार योजनेतील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी छोटेखानी सभादेखील झाली. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब व शहरातील काही उद्योजकांची व स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी मोठ्या व्होल्टचे हॅलोजन बल्ब लावण्यात आले होते. त्याच्या प्रकाशामुळे किंवा बल्बमधील गॅस गळती झाल्याने डोळ्यांना त्रास झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी सांगितले, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाल्टा येथे कार्यक्रम सुरू होता. तेथे मोठे हॅलोजन बल्ब लावण्यात आले होते. त्यामुळे कदाचित त्रास झाला असेल. मला काही त्रास झाला नाही; परंतु काही ग्रामस्थांसह संयोजकांना आणि प्रमुख पाहुण्यांनाही डोळ्यांचा त्रास झाल्याचे कानावर आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुठलाही विपरीत प्रकार यामागे नसल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले. आ. बंब यांच्या डोळ्यांना सूज आली असून त्यांनी स्वत: तपासणी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्योजक राम भोगले यांनादेखील डोळ्यांना त्रास झाला. गॅस गळतीने हा प्रकार घडल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. टी. चव्हाण यांनी सांगितले.